भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (INSA) ही देशातल्या सगळ्या प्रकारच्या वैज्ञानिक लोकांची मोठ्ठी संस्था आहे. हिचं मुख्य ठिकाण दिल्लीमध्ये आहे. २०१५ साली ह्यांनी तरुण संशोधक मंडळींसाठी Indian National Young Academy of Sciences नावानं वेगळी शाखा सुरू केली, जेणेकरून नव्या पिढीला संधी मिळावी.

संशोधनासाठी भेट देण्याची योजना – Visiting Research Program
INSA ही संस्था बऱ्याच वर्षांपासून भारतात संशोधनाला हातभार लावत आली आहे. आता सरकारच्या अनेक संस्था देखील निधी देतात, पण INSAचं बळ अजूनही टिकून आहे. ही संस्था निवृत्त झालेले पण अनुभवी वैज्ञानिकांसाठी खास योजना राबवते जसे की INSA डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर, INSA सीनियर सायंटिस्ट, ऑनररी व एमेरिटस सायंटिस्ट योजना, ज्यामुळे हे संशोधक देशात संशोधन आणि शिक्षणासाठी आपलं मोलाचं योगदान देत राहतात.
INSA Visiting Scientist Programme 2025
ही योजना अशा वैज्ञानिकांसाठी आहे ज्यांना इतर संस्थांमध्ये जाऊन काही खास तंत्रज्ञान शिकायचं आहे किंवा तिथली यंत्रसामग्री वापरायची आहे. भारतातल्या दुसऱ्या प्रयोगशाळा किंवा संशोधन केंद्रांमध्ये जाऊन काम करण्याची संधी यात मिळते. निवड झाल्यावर त्या व्यक्तीला “INSA Visiting Scientist” असं बिरुद दिलं जातं. दरवर्षी एकूण १२० मानवी महिने इतक्या कालावधीसाठी योजना मंजूर केली जाते. या योजनेत सहभागी होणाऱ्या वैज्ञानिकाला दर महिन्याला 30,000 मानधन मिळतं, जे राहणं, जेवण, व इतर किरकोळ खर्चासाठी असतं. शिवाय घरच्या संस्थेतून अभ्यासाच्या संस्थेपर्यंतचा प्रवास खर्च INSA भरून देतं.
ही योजना किमान १ महिना आणि कमाल ६ महिन्यांसाठी असते. अर्ज प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान सुरू होते आणि निवड मार्च-एप्रिलमध्ये होते. अर्जदाराने आपली कामाची योजना, CV सादर करावं लागते आणि जिथं भेट द्यायची आहे त्या संस्थेची परवानगी घेणे गरजेचे असते. अर्ज Online पद्धतीनं INSA च्या वेबसाइटवर भरायचा असतो.
अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२५ असून, अधिक माहितीसाठी [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा किंवा 9650970101 या क्रमांकावर फोन करावा. निवड झालेल्या वैज्ञानिकांना दर महिन्याचे 30,000 मानधन मिळणार आहे. अधिकृत जाहिरात व अर्जासाठी INSA च्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















