खुशखबर, तो कंत्राटी भरतीचा वादग्रस्त GR रद्द! – नवीन निर्णय जाहीर – Labour Department Maharashtra Bharti 2023
Industries, Energy and Labour Department Maharashtra Bharti 2023
Labour Department Maharashtra Bharti 2023
Kamgar Vibhag Bharti 2023
राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा (contract Recruitment) जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. राज्यात कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला आहे. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. कंत्राटी भरती कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. या संदर्भातील जाहिरात प्रकशित झाल्यावर आम्ही अपडेट महाभरतीवर प्रकाशित करूच. पुढील अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कंत्राटी भरती संदर्भात पहिला जीआर 13 मार्च 2003 रोजी काढण्यात आला. त्यावेळीच्या काँग्रेस आणि त शरद पवारांच्या सराकरमध्ये कंत्राटी भरती झाली. 2010 साली अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला. सहा हजार कंत्राटी पदाचा जीआर काढण्यात आला. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काळात कंत्राटी शिक्षण भर्तीचा जीआर काढण्यात आला. 2014 साली पुन्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील कंत्राटी भर्तीचा जीआर काढण्यात आला एमसीए, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पोस्ट साठी हा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर काढण्यात आला. 1 सप्टेंबर 2021 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळी कंत्राटी भर्तीचा जीआर काढण्यात आला, 15 वर्षाकरता कंत्राटी भर्तीसाठी एजन्सी तयार करण्यात आलं . आमच सरकार आल्यानंतर एजन्सीचे रेट जास्त आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर यावर लक्ष घातलं. कंत्राटी भरतीची सुरवात काँग्रेसने केली आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘एमपीएससी’ किंवा निवड मंडळाच्या कक्षेतील राज्य सरकारच्या नियमित पदांवर कुठल्याही स्थितीत कंत्राटी भरती केली जात नाही. नियमित स्वरूपाच्या पदांसाठी नियमित पदांची भरती चालूच आहे. कंत्राटी भरती ही केवळ विशिष्ट कालमर्यादा असलेल्या प्रकल्पांसाठी आहे, असे स्पष्टीकरण राज्य सरकारच्या कामगार विभागाने शुक्रवारी केले. राज्याच्या कामगार विभागाने तात्पुरत्या प्रकल्पांसाठीच कंत्राटी भरती केली जाते, नियमित पदांवर नाही, असे स्पष्ट केले आहे.
वस्तुतः कामगार विभागाकडे आतापर्यंत १४ विभागांचे सहा हजार ६१५ इतक्या मनुष्यबळाचे प्रस्ताव आले आहेत, ११ हजार मनुष्यबळाचे प्रस्तावच आलेले नसल्याने ती पदे भरण्याचे निश्चित झाले आहे, असे म्हणण्यात काहीच तथ्य नाहीं. तसेच नोव्हेंबरपर्यंत एक लाख पदभरती कंत्राटी पद्धतीने करण्याची करण्याची सरकारची कुठलीही योजना नाही. शिवाय, ही वर्ग २, ३ आणि ४ ची पदे नाहीत, तर वर्ग ३ आणि ४ ची पदे आहेत. वर्ग २ ची पदे या माध्यमातून भरण्याची परवानगी सामान्य प्रशासन विभागाने दिलेली नाही, असेही कामगार विभागाने नमूद केले आहे.
Khadi gram Udyog Vibhag Bharti 2023
Khadi gram Udyog Vibhag Bharti 2023 – While lakhs of candidates in the state are preparing for competitive exams in the hope of permanent jobs in the state, the state government has decided to hire manpower through outsourcing of vacant posts to ensure adequate funds for development works and cut down on administrative expenses. This has watered down the hard work of thousands of students. The government recently issued a decision to approve contractors of nine external service providers for recruitment of 138 posts under the Department of Industry, Energy, Labour and Mining.
शासकीय कायमस्वरूपी नोकरीच्या आशेने राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना राज्य शासनाने विकासकामांना पुरेसा निधी मिळावा व प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत १३८ पदांच्या भरतीसाठी नऊ बाह्य सेवापुरवठादार संस्थांच्या कंत्राटदारांना मान्यता देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.
राज्य शासनाच्या विविध विभागांत ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या चारही गटांच्या मिळून सरासरी तीन लाख जागा रिक्त आहेत. बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी नऊ सेवा पुरवठा संस्था आणि पॅनेलची नियुक्ती केली आहे. यामध्ये अतिकुशल मनुष्यबळाच्या वर्गवारीत तब्बल ७० प्रकारची विविध पदे भरली जातील. कुशल मनुष्यबळामध्ये ५०, अकुशलची १० प्रकारची पदे तर अर्धकुशल आठ प्रकारची पदे कंत्राटदार संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.
अतिकुशल मनुष्यबळ : प्रोजेक्ट ऑफिसर, मॅनेजर, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, जिल्हा समन्वयक, जनसंपर्क अधिकारी, आयटी अधिकारी
कुशल मनुष्यबळ : कायदा अधिकारी, शिक्षक, साहाय्यक शिक्षक, लेखाधिकारी, वरिष्ठ लिपिक, साहाय्यक संशोधक
अर्धकुशल गट : काळजीवाहक, हाऊसकीपिंग
अकुशल गट : मजूर, मदतनीस
Industries, Energy and Labour Department Maharashtra Bharti 2023– Maharashtra Industries, Energy and Labour Department (Udyog Urja v Kamgar vibhag Bharti 2023) new GR is published by Maharashtra State Government. As per this new GR the recruitment process for the Group C, Group D will begin soon. This recruitment process will be conducted by TCS & IBPS. The New GR shows approval of 698 posts under this department. More details about this recruitment is given in attached PDF file. So read the GR copy for more details.
महाराष्ट्र उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागभरती संदर्भातील नवीन शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. या निर्णयानुसार राज्य सरकार द्वारे ६९८ विविध गट-क आणि ड च्या पदाच्या आकृतिबंधाला मंजुरी दिली आहे. हि भरती प्रक्रिया IBPS आणि TCS द्वारे राबविण्यात येणार आहे.
Table of Contents