मित्रांनो आपल्या माहीतच आहे सध्या भारताच्या एव्हीएशन सेक्टरमध्ये सध्या मोठी प्रगती होत आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे की, ते लवकरच 1000 महिला पायलटांची भरती करणार आहेत. कंपनीने आपल्या सेवांचा विस्तार इतका केला आहे की, त्यांना तातडीने पायलटच्या पोस्ट भराव्या लागणार आहेत. डोमेस्टिक फ्लायर्स क्षेत्रात भारताचा समावेश जगातील टॉप देशांमध्ये होतो. अशा परिस्थितीत, कंपनीने आपल्या ताफ्यातील महिला पायलटांची संख्या हजाराहून अधिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे, ज्यामुळे महिला पायलटांना उत्तम संधी मिळणार आहेत. भारतात एव्हीएशन सेक्टर जोमाने वाढत असल्याने, इंडिगो विमान कंपनी येत्या एक वर्षात आपल्या ताफ्यातील महिला पायलटांची संख्या एक हजाराहून अधिक करणार आहे. सध्या कंपनीच्या ताफ्यात सुमारे आठशे महिला पायलट आहेत. या संदर्भातील अधिक माहितीवेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

इंडिगो कंपनीने एयरलाइन इंजीनियरिंग आणि फ्लाईंग स्टाफसह प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सध्या कंपनी 360 डिग्री दृष्टिकोनावर काम करत आहे, असे इंडिगो ग्रुपचे प्रमुख HR सुखजीत एस. पसरीचा यांनी सांगितले. इंजीनियरिंग विभागात महिलांची संख्या सुमारे 30 टक्क्यांनी वाढली आहे. आता देशातील सर्व विमान कंपन्यांमध्ये इंडिगो विमान कंपनीकडे सर्वाधिक महिला पायलट आहेत. ही संख्या कंपनीच्या एकूण पायलट्सच्या सुमारे 14 टक्के आहे. जागतिक पातळीवर विमान कंपन्यांमध्ये महिला पायलट्सची सरासरी 7 ते 9 टक्के आहे.
2025 पर्यंत टार्गेट होणार पूर्ण
इंडिगोने म्हटलंय की महिला पायलटच्या संख्येला 1,000 च्या पार करण्याचे टार्गेट ऑगस्त 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. इंडिगो विमान कंपनी दररोज 5000 हून अधिक फ्लाइट्सचे संचलन करत आहे. कंपनीजवळ एकूण 5,000 हून अधिक पायलट आहेत.भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या विमान कंपनीने बुधवारी आपल्या एयरबस आणि एटीआर विमानांसाठी एकूण 77 महिला पायलटांची भरती केलेली आहे. इंडिगोजवळ 31 मार्च 2024 पर्यंत 36,860 पर्मानंट कर्मचारी होते. यात 5,038 पायलट आणि 9,363 केबिन क्रू देखील आहेत.यात 713 महिला पायलट आहेत.यात एलजीबीटीक्यू वर्गाचे कर्मचारी देखील आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















