JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खुशखबर! परीक्षा नाही, थेट नोकरी! परीक्षा न देता गावातच व्हा पोस्टमन; 2,500 जागांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज! – Indian post Bharti 2026

Indian post Bharti 2026 – मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण युवक-युवतींसाठी मोठी बातमी आहे. भारतीय टपाल विभागाच्या ग्रामीण टपाल सेवेसाठी शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहायक शाखा पोस्टमास्तर (Indian post Bharti 2026 ABPM) पदांवर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसोबतच दहावीच्या गुणांच्या आधारावर नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते. चला तर या भरती बद्दल पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. आणि हि महाभरती वरील महत्वाची माहिती आपल्या सर्व मित्रांना सांगायला विसरू नका!

Indian post Bharti 2026 10th Pass

Post GDS भरती प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे व वेळापत्रक:

  • वन-टाईम रजिस्ट्रेशन (OTR): ३१ ऑगस्ट २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
  • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणा: ०२ सप्टेंबर २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
  • अर्ज दुरुस्ती : २३ सप्टेंबर २०२६ ते २४ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)

तर मित्रानो,  या पोस्ट विभागाच्या भरती अंतर्गत मालेगाव सर्कलमध्ये 57 आणि नाशिक सर्कलमध्ये 35 पदे भरली जाणार आहेत. या भरती मुले निश्चितच, ग्रामीण भागातील उमेदवारांना आपल्या गावाजवळ टपाल विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे पोस्ट ऑफिस भरती 2026, ग्रामीण डाक सेवक भरती आणि 10th pass उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांवर आधारित संगणकीकृत गुणवत्ता यादीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे लेखी परीक्षा, मुलाखत किंवा स्वतंत्र स्पर्धा परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांच्या दहावीतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तसेच लखस्त ठेवा ऑनलाइन नोंदणीची म्हणजेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर असून, अर्जातील दुरुस्तीची सुविधा 23 ते 24 सप्टेंबरदरम्यान उपलब्ध असेल. या भरतीची पूर्ण PDF जाहिरात आनी अर्ज लिंक आम्ही खाली दिली आहे.

✅ मालेगाव सर्कलमध्ये ५७ जागा
✅ नाशिक सर्कलमध्ये ३५ जागा
✅ दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र
✅ लेखी परीक्षा / मुलाखत नाही – फक्त दहावीच्या गुणांवर निवड

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने दहावी पास तरुणांसाठी भरती जाहीर केली आहे. देशाच्या केंद्रीय दळणवळण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या टपाल विभागाने ‘जीडीएस’ म्हणजेच ‘ग्रामीण डाक सेवक’ भरतीचे प्रसिद्धीपत्रक काढले आहे. देशातील विविध टपाल मंडळांमध्ये आणि विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांवरील भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीतून ब्राँच पोस्ट मास्तर (बीपीएम), असिस्टंट ब्राँच पोस्ट मास्तर (एबीपीएम) आणि डाक सेवक यांसारख्या रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भारत सरकार किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या कोणत्याही शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराने १० वी मध्ये गणित आणि इंग्रजी हे विषय उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. याशिवाय, उमेदवाराला संबंधित राज्याची किंवा टपाल मंडळाची स्थानिक भाषा किमान १० वी पर्यंत अभ्यासलेली असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे. नियमानुसार अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना ५ वर्षे, इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षे आणि अपंग (PwBD) श्रेणीतील उमेदवारांना १० ते १५ वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

वेतनश्रेणी आणि इतर अटी
निवड झालेल्या ग्रामीण डाक सेवकांना ‘टाईम रिलेटेड कन्टिन्युटी अलाउन्स’ (TRCA) अंतर्गत दर महिन्याला मानधन दिले जाईल. ब्रँच पोस्ट मास्टर: १२ हजार ते २९ हजार ३८० रुपये

असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर / डाक सेवक:१० हजार ते २४ हजार ४७० रुपये या व्यतिरिक्त महागाई भत्ता, ग्रॅच्युइटी आणि सर्व्हिस डिस्चार्ज बेनिफिट स्कीम यांसारखे लाभही लागू राहतील. जीडीएस पदे ही रोज ४ ते ५ तासांच्या कामाची असतात, त्यामुळे उमेदवारांकडे उपजीविकेचे अतिरिक्त साधन असणे आवश्यक मानले जाते. ब्रँच पोस्ट मास्टर पदावर निवड झालेल्या उमेदवाराला स्वतःच्या खर्चाने टपाल कार्यालयासाठी जागेची व्यवस्था करावी लागेल आणि त्याच गावात वास्तव्यास राहावे लागेल. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही पूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल. १० वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार ही गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड