Indian Army Recruitment : पुण्यात महिलांसाठी होणार लष्करभरती

Indian Army Recruitment Rally


Indian Army Recruitment Rally : The army has organized a recruitment rally for women. The recruitment process will take place on the grounds of the Army Institute of Physical Training in Pune from January 12th to 14th – महिलांसाठी लष्करातर्फे भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर १२ ते १४ जानेवारीदरम्यान पार पडणार आहे.महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील युवा महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा या उद्देश्याने ही भरती घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील इच्छुक महिला उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in. संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. १० वी उत्तीर्ण महिला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज केल्यावर उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर ओळखपत्र पाठवण्यात येईल.

उमेदवारांनी अर्ज भरताना भरतीकरिता आवश्यक मुद्दे पाहून काळजीपूर्वक अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झाले आहे. अशा महिला उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहायचे आहे. शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना बायोमेट्रिक पद्धतीने तपासून तसेच त्यांच्या ओळखपत्राची तपासणी करून त्यांना भरती ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लष्करी पोलीस दलात दाखल करून घेतले जाणार आहे.

कोरोनाची नियमावली पाळून होणार भरती प्रक्रिया

कोरोनाची सर्व नियमावली पाळून ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी मैदानावर सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टिकोनातून लष्करातर्फे सर्व काळजी घेतली जाणार आहे. उमेदवारांनी येताना आवश्यक कागदपत्रांची खरी प्रत, ओळखपत्र, तसेच झेरॉक्स आणि प्रतिज्ञापत्र घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोर्स : लोकमत


Indian Army Recruitment : लष्करात महिलांसाठी खुली भरती, जाणून घ्या कधी आणि केव्हा होणार रॅली

Indian Army Recruitment Rally : भारतीय लष्करात महिला सैन्य पोलिसांच्या दुसर्‍या बॅचच्या भरती रॅलीची प्रक्रिया सुरू केली जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 18 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत महिला सैन्य पोलीस (सैनिक जनरल ड्यूटी) साठी खुल्या भरतीचे आयोजन केले जात आहे.

खुशखबर – भारतीय सैन्य दलात एनसीसी स्पेशल एन्ट्रीची संधी

भारतीय सैन्य दलात भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भारतीय लष्करात सैनिक श्रेणीची ही भरती रॅली प्रक्रिया केवळ महिला कँडिडेट्ससाठी आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांच्या उमेदवारांसाठी भारतीय लष्करात महिला सैन्य पोलीस (सैनिक जनरल ड्यूटी) च्या नामांकनासाठी एएमसी सेंटर अँड कॉलेज, लखनऊ (उत्तर प्रदेश) च्या स्टेडियममध्ये 18 जानेवारी 2021 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत मुख्यालय भरती कार्यालय लखनऊद्वारे भरती रॅलीचे आयोजन करण्यात येईल.

5898 महिला उमेदवार सहभागी होण्याची शक्यता – Indian Army Recruitment Rally

इंडियन आर्मीकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांतील 5898 महिला या भारती प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे. भारतीसाठी 5898 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्यामध्ये 5573 उमेदवार युपी आणि 325 उत्तराखंडतील आहेत. या भारतीसाठी पात्रता/मापदंड योग्यता आणि चाचणीशी संबंधीत सविस्तर माहिती 27 जुलै 2020 च्या अधिसूचनेत देण्यात आली होती, जी www.joinindianarmy.nic.in चा वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सैन्य भरती कार्यालयाने उमेदवारांना दलाल आणि फसवणूक करणार्‍या व्यक्तींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. जर उमेदवारांची वागणूक चुकीची आढळली तर रॅलीमध्ये सहभागी होता येणार नाही आणि त्यांचा अर्ज रद्द केला जाईल.

सोर्स : पोलीसनामा2 Comments
  1. Sarika says

    Maharashtrat nahi ka hi bharti

  2. Kharmale Sonali babaji says

    Mam hi open bharati aahe ka….
    And
    Ya exam ch arj kuth karaycha aahe .

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड