भारतीय सैन्य दलात भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

Indian Army Recruitment 2021

Indian Army Recruitment 2021 : Army TGC 133 Application 2021: भारतीय सैन्याच्या तांत्रिक विभागात सरकारी नोकर भरती होत आहे. ज्यांना या सरकारी सेवेत रुजू होण्याची इच्छा आहे त्यांनी या भरतीकडे लक्ष द्यावे. भारतीय सैन्याद्वारे टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC – 133) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सैन्याद्वारे जुलै २०२१ मध्ये सुरू होणाऱ्या टीजीसी १३३ साठी अधिसूचना जारी झाली आहे. सोबतच अर्ज प्रक्रिया २५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार भारतीय सैन्याचे भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर जाऊन आर्मी टीजीसी अॅप्लिकेशन २०२१ अर्ज भरू शकतात. अर्ज प्रक्रिया २६ मार्च २०२१ पर्यंत सुरू राहील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

पद संख्या – 40 जागा

पात्रता काय?

सैन्यातील टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमधील इंजिनीअरिंग पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं असणं अनिवार्य आहे. अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. मात्र उमेदवारांना निवड झाल्यावर उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्रासह सर्व गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे. जुलै २०२१ ला ट्रेनिंग संस्था इंडियन मिलिट्री अकॅडमीत ही प्रमाणपत्रे जमा करावी लागतील.

वयोमर्यादा

१ जुलै २०२१ रोजी किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे. उमेदवारांचा जन्म २ जुलै १९९४ पूर्वीचा आणि १ जुलै २००१ नंतर झालेला नसावा.

अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सैन्याच्या भरती पोर्टलवर भेट द्यावी. यानंतर ऑफिसर्स एन्ट्री लिंकवर क्लिक करावे. यानंतर नवे पेज उघडेल, त्यात रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करावे. विचारलेली माहिती भरून सबमीट करावी. यानंतर यूजरनेम आणि पासवर्डच्या मदतीने लॉगइन करून आपला ऑनलाइन अर्ज सबमीट करावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 
PDF जाहिरात : http://bit.ly/3bDKcxW
ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/3uwi1cK

 13 Comments
 1. Susmit ganvir says

  12th pass art Gowrment bharti

 2. Shripati says

  Masan mins gandi kamgar job bahut ka

 3. Ganesh Pangare says

  Male Indian Army Nursing service recruitment

 4. Komal says

  Website open hot nahi he sir

 5. Favji sahab says

  12th art pass chalelka
  INDIAN ARMY khup iccha ahe
  Reply me

 6. Ganesh Desai Ghuge says

  आर्मी स्कुल प्रवेश ची जाहिरात टका

 7. surya says

  10 standard or 12 standard ke liye kb niklegi bharti.. Plzz reply me.. 🙏

 8. Ganesh barkade says

  Army Sport Bharti Che update dya na plzz open bharti relation bharti ta bharti chi update sanga na plzz

 9. Ganesh barkade says

  Army sport Bharti Pune kdi sutnar aahe

 10. Govind Kande says

  Website open hot nahi he sir

 11. balaji ghotankar says

  Nokari havi ahe

 12. Kartik says

  13 yar

 13. Vishranti kubal says

  Staff nusre sathi vacancy nhi ka???

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड