IDFC फर्स्ट बॅंकेत बंपर भरती, मिळेल चांगल्या पगाराची नोकरी – IDFC Bank Bharti 2024
IDFC Bank Bharti 2024
बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबईत तुम्हाला चांगल्या पगाराची संधी मिळणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
IDFC First बॅंकेत असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजर पदाची भरती केली जाणार आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ब्रांच मॅनेजिंग ऑपरेशनसाठी रिटेल बॅंकींग व्यवसाय संभाळावा लागणार आहे. आयडीएफससी फर्स्ट बॅंक शाखेतील नेहमीचे व्यवहार आणि व्यवस्थापकीय जबाबदारी संभाळावी लागेल. बॅंकेची पॉलिसी आणि प्रोसिजरचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. ग्रामीण भागातील डेजिग्रेटेड ब्रांचच्या ग्राहकांना ब्रांच ऑपरेशन आणि सर्व्हिस द्यावी लागणार आहे. आलेल्या अर्जाची डेटा एन्ट्री करणे, ग्राहकांचे आयडी आणि अकाऊंट्स बनवणे, केवायसी तपासणे, अर्जाचे फॉर्म आणि लोन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तपासणे, कॅश हॅंडलिंग आणि ट्रान्झाक्शन क्लियरिंग, बॅंकेचे चांगले ऑडीट रेटींग बनवून ठेवणे, बॅंकेच्या अंतर्गत आणि बाह्य ग्राहकांना योग्य सुविधा मिळतील यासाठी काम करणे, अशी जबाबदारी असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजरला पार पाडावी लागेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शिक्षण आणि अनुभव
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. तसेच त्याला संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव असावा. असे असले तरी फ्रेशर्सदेखील या पदांसाठी अर्ज करु शकतात.
पगार
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पद आणि अनुभवानुसार दरमहा 17 हजार ते 60 हजारपर्यंत पगार मिळू शकतो. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेच्या महाराष्ट्रातील शाखांमध्ये ही भरती होईल. यासाठी अर्जाची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Comments are closed.