IBPS Clerk पूर्व परीक्षा 2020 : परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना जारी
IBPS Clerk Prelims 2020
IBPS Clerk Prelims 2020: शनिवारी ५ डिसेंबर रोजी आयबीपीएस लिपिक पूर्व परीक्षा २०२० घेण्यात येणार आहे. देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लिपीक पदाच्या एकूण २५५७ रिक्त जागांवरील भरतीसाठी आयबीपीएस लिपिक ऑनलाइन पूर्व परीक्षा २०२० चा पहिला टप्पा शनिवारी पार पडत आहे. देशभरातील विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
आयबीपीएस लिपिक पूर्व परीक्षा २०२० ही ५, १२ आणि १३ डिसेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. पूर्व परीक्षेसाठी १८ नोव्हेंबर रोजी प्रवेशपत्रे देण्यात आली. ज्या उमेदवारांनी अद्याप आयबीपीएस लिपिक प्रिलिम्स अॅडमिट कार्ड २०२० डाउनलोड केलेले नाहीत ते अधिकृत वेबसाइट, ibps.in किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
आयबीपीएसने लिपिक पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र जारी करतानाच तसेच परीक्षेसाठी खास सूचना देण्यासाठी माहिती पुस्तिका देखील प्रसिद्ध केली आहे. आयबीपीएस लिपिक पूर्व परीक्षा योजना, नमुना प्रश्न, ऑनलाइन परीक्षा मॉडेलचा तपशील, परीक्षेसाठी आवश्यक सूचना आणि कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना, SOP आदि माहिती या पुस्तिकेत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर पुढील नियमांचे पालन केलेच पाहिजे – IBPS Clerk Prelims 2020
– आपल्या दिलेल्या परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधी पोहोचा.
– केवळ पुढील वस्तू सोबत बाळगा – मास्क, हातमोजे, पारदर्शक पाण्याची बाटली, हँड सॅनिटायझर (५० एमएल), पेन, प्रवेश पत्र, फोटो आयडी प्रूफ (मूळ आणि छायाप्रत दोन्ही).
– आपल्या कोणत्याही वस्तू दुसर्या उमेदवाराशी शेअर करू नका.
– सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.
– परीक्षेला जाण्यापूर्वी आरोग्य सेतू अॅपवर तुमच्या जोखमीची पातळी मार्क करा. जर स्मार्टफोन नसेल तर अॅडमिट कार्डसह दिलेला डिक्लरेशन फॉर्म भरून सही करून आणा. केंद्र प्रवेशादरम्यान तुमचा स्मार्टफोन जमा होईल.
– प्रवेशाच्या वेळी थर्मामीटरच्या सहाय्याने तुमच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. जर तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल तर, प्रवेश मिळणार नाही
– आयबीपीएस लिपिक प्रिलिम्स २०२० च्या सामान्य सूचना व इतर माहितीसाठी माहिती पुस्तिकाच्या लिंकवर जा.
आयबीपीएस लिपिक प्रिलिम्स २०२० मध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना २८ फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या ऑनलाइन मुख्य परीक्षेस बसता येईल.
सोर्स : म. टा.