IBPS भरती २०१९

IBPS Career 2019


बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाचं वृत्त आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसने (IBPS)विशेष अधिकारी (स्पेशलिस्ट ऑफिसर, SO)पदाच्या एकूण 1,163 जागांसाठी भरती जाहीर केलीये. यामध्ये, कृषी क्षेत्र अधिकारी(स्केल- I), आयटी अधिकारी (स्केल- I),कायदा अधिकारी (स्केल- I), राजभाषा अधिकारी (स्केल- I), मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I),आणि मानव संसाधन / वैयक्तिक अधिकारी (स्केल- I) या पदांचा समावेश आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे आय.टी. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, मानव संसाधन / कर्मचारी अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण १,१६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – आय.टी. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, मानव संसाधन / कर्मचारी अधिकारी, विपणन अधिकारी.
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २० वर्षे व कमाल ३० वर्षे असावे.
 • फीस
  • अनारक्षित प्रवर्गसाठी रु. ६०० /-
  • आरक्षित प्रवर्गसाठी रु. १०० /-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ६ नोव्हेंबर २०१९
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९

पहिल्या टप्प्यात 28 आणि 29 डिसेंबर रोजी पूर्व परीक्षा होईल. याचा निकाल जानेवारीमध्ये येईल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षा २५ जानेवारी २०२० रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. त्यानंतर अखेर फेब्रुवारी महिन्यामध्ये मुलाखत घेतली जाईल. अशाप्रकारे उमेदवाराची निवड केली जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्याचं वय २० ते ३० च्या दरम्यान असावं. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. परिणामी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर (ibps.in)असेलेले नोटीफीकेशन पाहूनच अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा1 Comment
 1. Pradip Arjun Ghadage says

  Sir rrb mumbai exam kdhi aahe

Leave A Reply

Your email address will not be published.