JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पुणे जिल्हा बँक भरती, अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर!! – PDCC Bank Bharti Result

PDCC Bank Bharti Result

PDCC Bank Bharti Result: उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी बँक) क्लार्क पदाच्या ३५६ जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या  अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आल्या आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) लेखनिक सरळ-सेवा भरती प्रक्रिये अंतर्गत पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात येत आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांना ई-मेल, एस.एम.एस. पाठविण्यात येणार आहेत.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

💥अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी

💥 उमेदवारांची प्रतीक्षा यादी

 


: मागील अपडेट्स : 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

बँकेने लेखनिकच्या ३५६ पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी ३१ हजार ३१२ उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते आणि ३१ हजार २६६ उमेदवार परीक्षेकरिता पात्र ठरवले होते. ही प्रक्रिया एम.के.सी. एल. या संस्थेमार्फत घेण्यात आली. त्यांनी २२ ऑगस्ट २०२५ ते २५ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील विविध परिक्षा केंद्रांवर परिक्षा घेतली. या परीक्षेसाठी १२ हजार २३५ उमेदवार ऑनलाईन परीक्षेस बसले होते. परीक्षेस ९० गुण आहेत, तर मुलाखतीस १०७१ उमेदवार पात्र ठरले आहेत, तर कागदपत्रे पडताळीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची गठित समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीनंतर लेखनिकांच्या ३५६ जागा भरल्या जाणार.


PDCC Bank Bharti Result

PDCC Bank Bharti Result: अखेर प्रतीक्षेचा अंत, उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी बँक) क्लार्क पदाच्या ३५६ जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लवकरच घोषित होणार आहे. त्यादृष्टीने बँकेकडून महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) या परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला पत्रान्वये कळविण्यात आल्याची माहिती बँकेकडून मिळाली. त्यामुळे परीक्षेस बसलेल्या उमेदवारांची बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे.

बँकेच्या कार्यरत असलेल्या सर्व शाखांमध्ये रिक्त पदांमुळे कामकाजात अधिक गतिमानता आणण्यासाठी परीक्षेद्वारे क्लार्क पदाच्या जागा भरण्याचा निर्णय तत्कालीन संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे ३५६ पदांसाठी लेखी परीक्षा झालेली आहे. बँकेच्या दीर्घकाळ लांबलेल्या या परीक्षेच्या निकालाकडे उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. आता मात्र हा निकाल एमकेसीएल एजन्सीकडून लवकरच घोषित होणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात पीडीसीसी बँक ही वार्षिक सुमारे २७ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करणारी एक अग्रगण्य बँक आहे. पुणे जिल्ह्यात बँकेच्या २९४ शाखा कार्यरत आहेत.
शेतकऱ्यांसह ग्राहकांसाठी बँकेकडून विविध कर्ज योजना राबविल्या जातात. त्यामध्ये पीक कर्जासह साखर कारखान्यांना देण्यात येणारे कर्ज, शैक्षणिक, व्यावसायिक कॅश क्रेडिट, ग्राहकोपयोगी वस्तू, औद्योगिक, वाहन, सोने तारण, गृहकर्ज आदींचा समावेश आहे. रिक्त जागांच्या पदभरतीनंतर बँकेच्या दैनंदिन कामाचा वेग वाढून योजना अंमलबजावणीलाही गती मिळणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड