१० वी, १२ वी जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार ! – HSC Exam Admit Card Download 2024

HSC Exam Admit Card 2024

HSC July Exam Admit Card 2024

HSC Exam Admit Card 2024: माध्यमिक (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे  यांनी दिली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून हॉल तिकीट प्राप्त करावेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हॉलतिकीट/प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून मिळणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक/ प्राचार्यांचा शिक्का देणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.  हॉल तिकीटामध्ये विषय व माध्यम बदल, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्वरीत शाळेस/महाविद्यालयास कळवावे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची पुन्हा प्रिंट काढून दुय्यम प्रत (डुप्लीकेट) असा उल्लेख करून प्रवेशपत्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव शैलेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

HSC Exam Admit Card 2024

HSC Exam Admit Card Download 2024 : The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (State Board) will conduct the 12th examination in the month of February-March. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has released the final time table for MSBSHSE Maharashtra Board (State Board) 12th Exam. Accordingly, the written exam will be held from 21st February to 23rd March, while the oral, practical, internal evaluation exam will be held from 2nd to 20th February. (HSC Exam Admit Card)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून २२ जानेवारी रोजी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असून, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहे, तर तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून २२ जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.

MSBSHSE Maharashtra Board Admit Card

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. प्रवेशपत्रात विषय, माध्यमाबाबत बदल असल्यास त्याच्या दुरुस्त्या शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत.

प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्याचे नाव, छायाचित्र, स्वाक्षरी या बाबतच्या दुरुस्त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा-महाविद्यालयांनी पुन्हा प्रवेशपत्राची प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून ती विद्यार्थ्यांना द्यायची आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी गुण ऑनलाईन भरण्याची मार्गदर्शक सूचना

१०वी १२वी फेब्रु-२४ खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज अतिविलंब शुल्कांबाबत

इ १०वी इ १२वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ शिक्षासूची वाचनाबाबत.

परीक्षक नियामक यांच्या मानधनाचे सुधारीत दराबाबत

इ१२वी जुलै\ऑगस्ट २०२३ पासून सुधारित दराने परीक्षा शुल्क आकारण्याबाबत

Download Admit Card

HSC March-April 2023 Hall Ticket Declared 

HSC Exam Admit Card : Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will conduct Class XII examination in March-April 2023. Admission to the written test has been announced. Hall tickets should be downloaded from the following link. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२३ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करावे.

इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. शाळा तसेच महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र २७ जानेवारी पासून डाऊनलोडसाठी  सुरू होत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र घेऊन ठेवावे असे सांगण्यात आले आहे. ( Latest 12th Hall Ticket News)

HSC Exam Admit Card 2023

याबाबात शाळा तसेत महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाने संबंधित प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. यासाठी कोणतेही अतीरिक्त शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये असेही सांगण्यात आले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याकडून शाळा जास्तीचे पैसे घेत असल्यास तत्काळ या बाबात तक्रार दाखल करावी. अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्य मंडळाच्या https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उद्यापासून उपलब्ध होतं आहे. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून आणि स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. तसेच प्रवेशपत्रात विषय, माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात, असे सांगण्यात आले आहे.

तसेच दिलेल्या प्रवेशपत्रात छायाचित्रात सदोष असेल तर त्यावर विद्यार्थ्याचे दुसरे छायाचित्र चकटवावे. तसेच त्यावर मुख्यध्यापकांची स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा. तसेच विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र गहाळ झाले तर, पुन्हा त्याची प्रत काढून घ्यावी आणि त्यावर लाला रंगाच्या शाईने द्वितीय पत्र असल्याचा शेरा द्यावा. तरच विद्यार्थ्याला परिक्षेस बसता येईल. असे राज्य मंडळा मार्फत सांगण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या वेळेत घेण्यात येणार आहे.

 

अधिकृत वेबसाईट – www.mahahsscboard.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3HCbWS8


12th Exam Hall Tickets

HSC Exam Admit Card: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will conduct the Class XII examination in March-April 2022. HSC exam hall tickets for 12th standard students will be available from tomorrow. Students will be able to obtain hall tickets from their school / junior college. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) बुधवारी (दि.९) दुपारी १ वाजता राज्य मंडळाच्या (www.mahahsscboard.in) या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून घेता येतील.

  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये.
  • हॉल तिकीट मध्ये विषय माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत.
  • तसेच हॉल तिकीट वरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या स्वीकारून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे.
  • एखाद्या हॉल तिकीटावर सदोष छायाचित्र असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे,

अधिकृत वेबसाईट – www.mahahsscboard.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3HCbWS8


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड