खुशखबर! होमगार्ड्सना राज्य शासनाचे मोठे गिफ्ट; मानधनात दुप्पट वाढ!! । Home Guard Bharti 2024
Home Guard Bharti 2024
Home Guard Bharti 2024
राज्यातील होमगार्डांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय १ ऑक्टोंबरला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबाबत शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी होमगार्डांच्या मानधनात भरीव वाढ केली असून प्रतिदिन ५७० वरून १०८३ रुपये केल्याची माहिती ट्विट करत फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा लाभ राज्यातील ४० हजार होमगार्डंना होईल असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला होता. तर ही वाढ कर्तव्य भत्यांपासून ते भोजन भत्त्यांपर्यंत सर्व भत्यांमध्ये केली जाईल, असेही सांगण्यात आले होते. तसेच होमगार्ड भरतीत शारीरिक चाचणी कशी होणार ? काय आहे गुणपद्धती येथे तपासा व या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स आणि सर्व जिल्ह्याच्या जाहिराती वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची व्हट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यानिर्णयाप्रमाणे राज्य शासनाकडून ९ ऑक्टोंबर रोजी राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. या शासन आदेशात होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिन ५७० वरून १०८३ रुपये करण्यात आले आहे. राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यावरून फडणवीस यांनी, होमगार्ड्सच्या मानधनात जवळपास दुप्पट वाढ करण्यात आली आहे. हे मानधन देशात सर्वाधिक असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच राज्यातील सुमारे ५५ हजार होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. १ ऑक्टोबर २०२४ पासून ही वाढ देण्यात येईल, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तर गेल्याच महिन्यात सुमारे ११ हजार २०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते असून सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेली होमगार्ड भरती अखेर गुरुवारी (दि. २६) सकाळपासून पावसातच सुरू झाली. पहिल्या दिवशी भरती प्रक्रियेसाठी बोलावलेल्या ३३०० उमेदवारांपैकी तब्बल २४४८ उमेदवारांनी भरतीकडे पाठ फिरवली. त्यातील २२८ महिला आणि ३३२ पुरुष असे ५६० उमेदवार अपात्र ठरले. २९५ महिला आणि ५५७ पुरुष उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणी झाली. त्यातील २९२ उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरल्याची माहिती समादेशक अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.
होमगार्डच्या रिक्त ३८३ जागांसाठी २४ सप्टेंबरपासून पोलिस परेड मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, अतिवृष्टी आणि व्हीआयपी बंदोबस्तांमुळे भरती प्रक्रिया तीन दिवस पुढे ढकलली होती. अखेर गुरुवारी सकाळपासून पावसातच भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी पोलिस परेड मैदानावर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. मैदानावर चिखल असल्याने धावण्याची चाचणी कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखाना ते शिये पूल या मार्गावर घेण्यात आली.
Maharashtra Home Guard Bharti 2024 Updates – पुण्यासह राज्याच्या नागरी संरक्षण दलात (होमगार्ड) तब्बल दहा हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हानिहाय भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. हे मनुष्यकाळ येत्या डिसेबरपर्यंत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दहा हजार महित्य पुरुषांना संधी मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थिती तसेच प्रमुख उत्सव, मिरवणुका आणि राजकीय नेत्यांच्या सभांच्या वेळी बंदोबस्तात पोलिसांना साहाय्य म्हणून होमगार्ड महत्वाची भूमिका बजावतात, पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात होमगार्ड पांचो मंजूर संख्या चार हजार इतकी आहे, परंतु सध्या केवळ बावीसशे होमगार्ड कार्यरत आहेत. जिल्ह्यात अद्याप अठराशे, तर राज्यात सुमारे दहा हजार पदे रिक्त आहेत. या पदांसाठी भरती प्रकीया लवकरच सुरु होण्याचे संकेत आहे.
तसेच मानधनाबाबतच्या संदर्भात पोलिस महासंचालक (होमगार्ड) रितेश कुमार म्हणाले, “राज्यात होमगार्डची दहा हजार रिक्त पदे भरण्यात येत आहेत. जिल्हानिहाय भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबत राज्यातील जिल्हा समादेशकांना (अतिरिक्त पोलिस अधीक्षक) सूचना दिल्या आहेत.” दरम्यान, होमगार्डच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे विचाराधीन आहे. पोलिसांच्या खांद्याला खांदा त्पवून होमगार्ड कर्तव्य बजावत असतात. त्यांना बंदोबस्तासाठी दिवसाचे केवळ ५७० रुपये मानधन मिळते. याशिवाय दैनदिन भोजनभत्ता केवळ शंभर रुपये आहे. त्यामध्ये वाद होण्याची गरज आहे. त्यानुसार होमगार्डना एक हजार ते बाराशे रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडे पाठविण्यात आला आहे. दम्यान, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी होमगार्डच्या संबंधित जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
होमगार्डच्या विविध भत्यांमध्ये वाढ करण्याच्या गृहविभागाच्या प्रस्तावाला वित्त विभागाने स्थगिती देण्याची सूचना केल्यानंतर भत्ता वाढ रोखण्यात आल्याचे समोर आले आहे. गृहविभागाने ही प्रस्तावित भत्ता वाढ रोखावी, अशा आशयाचे पत्र होमगार्डच्या महासमादेशकांना पाठविले आहे. राज्याच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध लोकप्रिय योजनांची घोषणा केली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवरील भार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे गृहविभागाच्या या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे गृहविभागाने सादर केलेला भत्ता वाढीचा प्रस्ताव काही काळासाठी पुढे ढकलण्याबाबत किंवा सद्यास्थितीत स्थगित ठेवण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे, असा अभिप्राय वित्त विभागाने दिल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे महा होमगार्ड भरती 2024 साठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. होम गार्ड भारती PDF, प्रारंभ आणि शेवटची तारीख, वेळापत्रक, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया यासारखे अधिक तपशील संलग्न PDF फाईलमध्ये आहेत. तसेच ऑनलाइन नोंदणी, अर्ज आणि इतरांसाठी अधिकृत वेबसाइट लिंक दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात होमगार्डच्या नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी बातमी आहे. गृह विभागामार्फत येत्या उद्या पासून होमगार्डस्ची भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असून, सुमारे ९ हजार ७०० पदासाठी ही भरती होण्याची शक्यता आहे. होमगार्ड पदासाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ३४ जिल्ह्यात ही भरती होणार आहे. उमेदवारांनी 15 जुलै 2024 पासून सातारा, इतर जिल्ह्यांसाठी ऑनलाइन लिंक 25 जुलै 2024 पासून सक्रिय केली जाईल आणि बीड होमगार्ड भरती ऑनलाइन लिंक 26 जुलै 2024 रोजी सक्रिय होईल. देय तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. या नोकरीसाठी २० ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे. विशेष म्हणजे, जवळपास ६ वर्षांपूर्वी ही भरती करण्यात आली होती. १०१८-१९ या वर्षात होमगार्ड पदासाठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना फिजिकल क्षमता परीक्षा द्याव्या लागणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे.
: Homeguard Bharti District Wise Links :
जिल्हा निहाय माहितीपत्रक /जाहीरातीकरीता खालील लिंक वर क्लिक करा.
त्या अनुषंगाने गृह विभागामार्फत येत्या उद्या पासून होमगार्डस्ची भरती प्रक्रिया राबविला जाणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियाला प्रारंभ होणार आहे. होमगार्डस्साठी अर्ज करणार्या उमेदवारांना रहिवाशी ठिकाण असलेल्या पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातच अर्ज करता येणार आहे. अर्ज नोंदणी करण्यापूर्वी जाहीर होणाऱ्या अंतिम अधिसूचनेत रिक्त जागांची माहिती दिली जाणार आहे.
Eligibility Criteria For Maharashtra HG Bharti 2024 – होमगार्ड पात्रतेचे निकष
अ) शैक्षणिक पात्रता – कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)
Salary Details For Home Guard Vacancy 2204
होमगार्ड ना देय भत्ते होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो.
Physical Measurement Maharashtra Home Guard Recruitment 2024 – शारिरीक पात्रता
१. वय – २० वर्षे पुर्ण ते ५० वर्षांच्या आत. (दि. ३१/०७/२०२४ रोजी)
२. उंची – पुरुषांकरीता – १६२ से. मी. महिलांकरीता – १५० से. मी.
३. छाती – (फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) (न फुगविता किमान ७६ से.मी. कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक)
List Of Documents Required For Maha Home Guard Bharti 2024 – होमगार्ड भरतीस आवश्यक कागदपत्र
१. रहीवासी पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
२. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
३. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला.
४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
५. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
६. ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र
Technical Marks Required Under Mahahg Recruitment 2024
Home Guard Bharti 2024: गृहरक्षक दल अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात रिक्त असलेल्या ९ हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक तथा महासमादेशक यांनी दिली. या भरती प्रक्रियेचे अर्ज लवकरच सुरु होणार असल्याचे समजते. तसेच उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्हयात एकूण 9700 इतका मानसेवी होमगार्डचा अनुशेष आहे. सदर अनुशेष भरुन काढण्याकरिता भरती प्रक्रिया दि. 16.8.2024 पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येऊ शकते. या संदर्भातलं एक परिपत्रक सध्या सोशल मीडियावर व्हयरल झाले आहे.
Home Guard Bharti 2024: Applications are invited for the posts of “Home Guard”. There are total of 10,285 vacancies are available. The application is to be done online. Applications will start from 24th of January 2024. Also. Last date to apply is 13th of February 2024. For more details about Home Guard Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
होम गार्ड महानिर्देशक अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 10,285 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – होमगार्ड
- पदसंख्या – 10,285 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 20-45 वर्षे
- अर्ज शुल्क – ₹100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट – https://dghgenrollment.in/
Home Guard Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
होमगार्ड | 10,285 पदे |
Educational Qualification For Home Guard Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
होमगार्ड | 12th Pass (Senior Secondary) /(for Ex-Servicemen/Ex-CAPF Personnel:- 10th Pass |
Home Guard Notification 2024 – Important Documents
- वैध पासपोर्ट
- निवडणूक आयोगाचे फोटो I कार्ड
- त्याचे नाव आणि छायाचित्र असलेले वर्तमान आणि वैध शिधापत्रिका. शिधापत्रिका नसल्यास उमेदवाराचा फोटो, त्याला दुसर्या ओळखीचा पुरावा बेअरिंगद्वारे समर्थित करणे आवश्यक आहे अर्जदाराचे छायाचित्र.
- वाहतूक विभाग GNCT दिल्ली द्वारे जारी केलेला वैध ड्रायव्हिंग परवाना.
- सार्वजनिक क्षेत्रातील बँक खात्याचे रहिवासी असलेले छायाचित्र असलेले प्रमाणित पासबुक
- महसूल विभागाच्या सक्षम/अधिकृत सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र
How To Apply For Home Guard Application 2024
- या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dghgenrollment.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/hquC7 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/yAHIM |
✅ अधिकृत वेबसाईट | https://dghgenrollment.in/ |
Table of Contents
Home guard Bharti 2024
Sai mala Astama cha tras ahe police Bharti kivha ittar bharti made physical la kahi problem nahi honar n