JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

हिंगणघाट येथे २४ फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन!! – Hinganghat Rojgar Melava Apply Online

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि रा. सु. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे (Hinganghat Rojgar Melava Apply Online). या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pandit Deendayal Upadhyay Employment Fair to be Held on February 24!!

 

हा रोजगार मेळावा रा. सु. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात लाईफ इंश्युरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पिपल ट्री प्रायव्हेट लिमिटेड, डीजीआयटीओ टेक्निकल कंपनी, इंडोरामा सिथेटिक्स कंपनी, टाटा स्ट्राईव्ह, स्वतंत्र मायक्रो फायनान्स, संस्कार अ‍ॅग्रो वायगाव, एमडीसीएचजी वर्धा, न्यूबेनो नागपूर, एसएसएम फार्मा कंपनी वणी, नवभारत फर्टिलायझर कंपनी अमरावती, सीआयटी कंपनी पुणे, टेलनसेतू कंपनी, ईरोज हुंदाई वर्धा, रवि अ‍ॅडव्हर्टायझिंग, वैभव एंटरप्रायजेस नागपूर अशा अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

या कंपन्यांकडील २,००० हून अधिक रिक्त पदांकरिता प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे घेऊन उपस्थित राहावे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:
इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदविका प्राप्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. १८ ते ४० वर्षे वयोगटातील उमेदवारांसाठी हा रोजगार मेळावा खुला आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी कळविले आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड