हिंगणघाट येथे २४ फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन!! – Hinganghat Rojgar Melava Apply Online
Hinganghat Rojgar Melava Apply Online
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि रा. सु. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे (Hinganghat Rojgar Melava Apply Online). या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा रा. सु. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात लाईफ इंश्युरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पिपल ट्री प्रायव्हेट लिमिटेड, डीजीआयटीओ टेक्निकल कंपनी, इंडोरामा सिथेटिक्स कंपनी, टाटा स्ट्राईव्ह, स्वतंत्र मायक्रो फायनान्स, संस्कार अॅग्रो वायगाव, एमडीसीएचजी वर्धा, न्यूबेनो नागपूर, एसएसएम फार्मा कंपनी वणी, नवभारत फर्टिलायझर कंपनी अमरावती, सीआयटी कंपनी पुणे, टेलनसेतू कंपनी, ईरोज हुंदाई वर्धा, रवि अॅडव्हर्टायझिंग, वैभव एंटरप्रायजेस नागपूर अशा अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या कंपन्यांकडील २,००० हून अधिक रिक्त पदांकरिता प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे घेऊन उपस्थित राहावे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:
इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदविका प्राप्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. १८ ते ४० वर्षे वयोगटातील उमेदवारांसाठी हा रोजगार मेळावा खुला आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी कळविले आहे.