ग्रंथपाल पदांची २५०+ पदे रिक्त !- Granthpal Bharti 2023

Granthpal Bharti 2023

Granthpal Bharti 2023 – Granthpal Post Bharti process is pending from last few years. Large number of candidates are waiting for this recruitment process. The Candidates are waiting to conduct this Bharti process. More details about this are given below.

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांतील अत्यंत महत्त्वाच्या व एकाकी असलेल्या प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती प्रक्रिया प्रचंड रेंगाळली आहे. यासंदर्भात गेल्या हिवाळी अधिवेशनात जानेवारी महिन्यात निर्णय घेऊ, अशी घोषणा उच्च शिक्षण मंत्र्यांनी केली होती. मात्र, फेब्रुवारी महिना संपत आला तरी पदभरती सुरु केली नसल्याने पात्रताधारकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सध्या राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांतील दोन हजार ८८ प्राध्यापकांच्या पदांना भरतीसाठी शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, ही पदे अन्यायकारक पद्धतीने भरतीपासून दूर ठेवली आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाने केला आहे.

 

राज्य सरकारने प्राध्यापक भरतीची घोषणा केली, मात्र ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालकांच्या रिक्त पदांकडे दुर्लक्ष केले आहे. प्राध्यापक संवर्गातील ही पदे महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, हजारोंच्या पदभरतीत शासन जेमतेम २५० पदांच्या भरतीची अडवणूक करत असल्याच्या भावनेने राज्यातील उमेदवार आक्रमक झाले आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Granthpal Bharti 2023

 

राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांतील विविध पदांची भरतीप्रक्रिया ही गत अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने रखडली असून यात प्रामुख्याने ग्रंथपाल पदांचाही समावेश आहे. आधी आरक्षण, निवडणूक आचारसंहिता व इतर तांत्रिक अडचणीत भरती प्रक्रियेला विलंब झाला असून आता कोरोनामुळे महाविद्यालय ग्रंथपालांसह इतर पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

 

महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, महाविद्यालयांतील हे महत्त्वाचे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. सन २०१८ मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ग्रंथपाल पदांच्या १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली.

मात्र, भरतीप्रक्रिया वारंवार स्थगित करण्यात आल्याने पात्रताधारक उच्चशिक्षित उमेदवारांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रंथपाल पदभरती प्रक्रिया बंद असल्याने ग्रंथालय शास्त्राचे उच्च शिक्षण घेऊनही पात्रता धारकांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली असून ग्रंथपाल पदांसाठी भरती प्रक्रिया केव्हा राबविली जाणार असा सवाल पात्रता धारक उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाविद्यालयांतील ग्रंथपालांची भरती प्रक्रिया बंद असताना शिक्षण संस्थांकडून ग्रंथालयांमध्ये मानधन तत्वावरही पात्रताधारक उमेदवारांच्या नियुक्त्या होत नसल्याने उच्च शिक्षण घेऊन बसलेले पात्रताधारक हवालदिल झाले असून ग्रंथपाल पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Rahul says

    Open Cast La Fee Ani Cast Madhil MembrLa free ase Ka Open cast Valane kay Ghode Marle Aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड