ग्रामीण रुग्णालया मधील पदभरतीसाठी मुलाखती घेण्यात आलेल्या पण निकाल कधी?? Gramin Rugnalaya Maregaon Bharti 2025

Gramin Rugnalaya Maregaon Bharti 2025: मारेगाव आदिवासी पेसा बोटोणी गावात सुरु झालेल्या जनकल्याण समीती द्वारा संचालीत ग्रामीण रुग्णालया मधील पदभरतीसाठी मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. मात्र पदिर्घ कालावधी नंतरही नियुक्तीची यादी जाहीर करण्यात आली नाही किंवा कोणालाही नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या बेरोजगारा मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Maregaon Rural Hospital Walk In Result

मारेगाव तालुक्यातील बोटोणी या आदिवासी पेसा गावात जनकल्याण समीती द्वारा ग्रामीण रुग्णालय उघडण्यात आले आहे. येथीलच पांडे यांच्या निवासस्थानी भाडेतत्वावर सुरु करण्यात आलेल्या या ग्रामीण रुग्णालयातील पदभरतीची जाहिरात करण्यात आली होती. विविध पदे भरण्या बाबत काही वृत्तपत्रातुन झळकलेल्या जाहीराती वरुन मोठ्या संख्येने इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. मात्र प्रदिर्घ कालावधी नंतरही रिझल्ट(Maregaon Rural Hospital Walk In Result)  लागलेला नाही. त्यामुळे हा रिझल्ट कधी लागेल? या बाबत उत्सुकता लागलेली आहे. मारेगाव तालुक्यात सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बोटोणीत पदभरती होणार या अपेक्षेने मुलाखतीसाठी बेरोजगारांनी प्रचंड गर्दी केली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मात्र अजुनही बेरोजगार बांधवांच्या हाती नियुक्तीचे आदेश पोहचलेले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. जणकल्याण समीतीच्या संस्थाध्यक्षा कडुन हे रुग्णालय संस्थेच्या स्वनिधीतुन तथा देणगीतुन सुरु केल्याची माहीती स्थानिक ग्रामपंचायतीला दिली असली तरी मात्र वृत्तपत्रा मधुन हे रुग्णालय शासनमान्य तथा अनुदानीत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे संस्थाध्यक्षांनी दिलेली माहीती नेमकी खरी कोणती?याबाबत बोटोणी गावात तर्क वितर्क सुरु आहे. तसेच सुरु झालेल्या रुग्णालया मधील  कार्यरत कर्मचारी विना वेतन सेवाभावी वृत्तीने काम करीत असुन शासकीय अनुदान प्राप्त होत नाही तो पर्यत दररोज काम करीत असल्याची माहीती संस्थाध्यक्षांनी ग्रामपंचायतीला दिली आहे.
मात्र विना वेतन काम करणारे कर्मचारी उपलब्ध असतांना संस्थाध्यक्षांना वृत्तपत्रातुन नविन पदभरतीची आवश्यकता का वाटावी? असा प्रश्न बेरोजगार बांधवां मध्ये चर्चिला जात असुन नेमकी भानगड आहे तरी काय? याबाबत संस्थेच्या वतीने कोणीही ब्र काढायला तयार नाही. त्यामुळे आपली फसवणूक होणार तर नाही ना! अशी शंका आता अनेका मधुन व्यक्त होत आहे.
——————————————-
आदिवासी पेसा गावात सुरु झालेले हे रुग्णालय गावकऱ्याची  दिशाभुल करणारे आहे. रूग्णालयातील रोज काम करणारे कर्मचारी प्रमाणीत आहे की नाही याबाबत चौकशीची गरज आहे. अन्यथा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महादेव सिडाम
माजी सरपंच बोटोणी
———————————————
या रुग्णालयाची चौकशी झाल्यास लवकरच सत्यता उघड होईल बोटोणी पेसा ग्रामपंचायत कुठल्याही बेकायदेशीर गैरप्रकारांना थारा देत नाही. सर्व प्रकाराचा पाठपुरावा सुरु आहे.
प्रविण वनकर 
सरपंच बोटोणी

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड