Govt Internships 2025 Program – फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणे किंवा चांगला अनुभव मिळणे बरेच वेळा कठीण राहते. यांचा अनुषन्गाने भारत सरकार द्वारे एक नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. यात, सरकारी इंटर्नशिप्स 2025 मध्ये विद्यार्थ्यांना आणि नुकतेच पदवीधर झालेल्या लोकांना व्यावसायिक अनुभव मिळवण्यासाठी इंटर्नशिप्स साठी मस्त संधी प्रदान करतात. या अंतर्गत विविध प्रोग्रॅम मध्ये 15,000 किंवा त्यापेक्षा जास्त स्टायपेंड दिले जात आहे. या इंटर्नशिप्स सार्वजनिक धोरण, प्रशासन, संशोधन, आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये करियर निर्माण करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. या साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पदवीधर फ्रेशर उमेदवार खालील लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
2025 मध्ये सरकारी इंटर्नशिप का निवडाव्यात?
सरकारी इंटर्नशिप्स विविध फायदे असतात. एकतर प्रक्रिया एकदम सोपी आहे. आणि आपल्या रिस्युम मध्ये एक सरकारी अनुभवाची नोंद होते हि साहजिकच पुढील भविष्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे हे निश्चित.
शासन आणि सार्वजनिक धोरणांमध्ये प्रत्यक्ष अनुभव
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी
15,000 किंवा त्यापेक्षा जास्त स्टायपेंड मिळवणे
चांगल्या नेटवर्किंग संधी आणि भविष्यकालीन सरकारी नोकरीसाठी प्राथमिकता
2025 मध्ये मिळणाऱ्या शीर्ष सरकारी इंटर्नशिप्स बद्दल थोडक्यात माहिती !
NITI आयोग इंटर्नशिप
स्टायपेंड: ₹15,000 ते ₹20,000
कालावधी: 6-8 आठवडे
पात्रता: संबंधित क्षेत्रातील UG/PG विद्यार्थी
RBI इंटर्नशिप योजना
स्टायपेंड: ₹21,000/महिना
कालावधी: 3-6 महिने
पात्रता: पदवीधर/PhD विद्यार्थी
MeitY इंटर्नशिप
स्टायपेंड: ₹15,000+
कालावधी: 2-3 महिने
पात्रता: B.Tech/M.Tech विद्यार्थी
लोकसभा इंटर्नशिप
स्टायपेंड: ₹18,000/महिना
कालावधी: 1-3 महिने
पात्रता: PG विद्यार्थ्यांना लॉ, पॉलिटिकल सायन्स इत्यादी क्षेत्रांत
SEBI इंटर्नशिप
स्टायपेंड: ₹20,000/महिना
कालावधी: 2-6 महिने
पात्रता: PG विद्यार्थी वित्त, कायदा इत्यादी क्षेत्रांत
कसा कराल अर्ज?
सर्वसाधारणपणे, सरकारी इंटर्नशिपसाठी खालील गोष्टींचा अर्ज आवश्यक असतो:
अद्ययावत रिझ्युमे/CV
स्टेटमेंट ऑफ पर्पस (SOP)
शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि शिफारस पत्र (काही कार्यक्रमांसाठी)
आवश्यक ओळखपत्रे
तर मित्रांनो, 2025 मध्ये सरकारी इंटर्नशिप्स केवळ शॉर्ट-टर्म शिकण्याचा फक्त अनुभवच नाही, तर हे एक आपल्या उज्ज्वल करियरसाठी लाँचपॅड आहेत जे भविष्यातील सरकारी नोकऱ्या आणि संशोधन क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. या इंटर्नशिप्समध्ये ₹15,000+ स्टायपेंड मिळवणे आणि खूप एक चांगला तगडा अनुभव मिळणे हे एक मस्त कॉम्बिनेशन आहे!!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















