कामगार रुग्णालयातील ५०% पदे रिक्त! रुग्णांची काळजी कोण घेणार? ! – Government Hospital Bharti 2024
Government Hospital Vacancies
Government Hospital Bharti 2024
नागपूरच्या राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयात सुमारे ५० टक्के पदे रिक्त असल्याने रुग्णसेवा ठप्प झाली आहे. रुग्णालयाच्या ३३२ मंजूर पदांपैकी १६८ पदे रिक्त असून, यातील १३ पैकी १० विशेषज्ञ डॉक्टर फक्त कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णसेवेची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
राज्य कामगार विमा योजनेद्वारे अल्पवेतन कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हे रुग्णालय उभारण्यात आले होते, ज्यात ३.६३ लाख कामगार आणि ११.३३ लाख कुटुंबीयांचा समावेश आहे. कामगारांच्या वेतनातून आणि कंपनीमालकांकडून मिळणाऱ्या निधीच्या रूपात कोट्यवधी रुपये या रुग्णालयासाठी जमा होतात, परंतु यामध्ये आवश्यक सुविधा व अद्ययावत सोयींचा अभाव जाणवतो. त्यामुळे अनेक रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये रेफर करण्याची वेळ येते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रुग्णालयात रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असून, यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी, बधिरीकरण शास्त्रज्ञ, क्ष-किरण शास्त्रज्ञ, जीवरसायन शास्त्रज्ञ व सहाय्यक अधिसेविकेची पदे रिक्त आहेत. तसेच परिचारिकांच्या १७, समवैद्यकीय संवर्गाच्या १५, लिपिक संवर्गाच्या ११ पदांसह एकूणच कर्मचारी वर्ग अपुरा आहे. या रिक्त जागांमुळे वाढत्या रुग्णसंख्येला रुग्णालय योग्य सेवा देऊ शकत नाही, ज्यामुळे कामगार वर्गात असंतोष वाढत आहे.
सोमवारी पेठ येथील कामगार रुग्णालयात १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत तब्बल २ लाख ५१ हजार ८५० कामगारांनी बाह्यरुग्ण विभागातून (ओपीडी) उपचार घेतले आहेत. सरासरी महिन्याला २० हजार रुग्ण येथे येऊन उपचार घेतात. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मेडिसीन विभागात येतात, जिथे दरमहा सुमारे सहा हजार रुग्णांची नोंद होते. त्याखालोखाल ऑर्थोपेडिक विभागात चार हजार, सर्जरी विभागात दोन हजार, आणि स्त्रीरोग व प्रसूती विभागात सुमारे १,४०० रुग्ण उपचार घेतात. रोजची ओपीडी संख्या जवळपास ८४५ रुग्णांपर्यंत पोहोचते.
परंतु, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ६७ टक्के पदे रिक्त असल्याने रुग्णालयात अडचणी निर्माण होत आहेत. मंजूर असलेल्या १६५ पदांपैकी फक्त ५४ पदे भरलेली असून, उर्वरित १११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सफाई, अटेंडंट, आणि इतर मूलभूत कामांवर परिणाम होऊन रुग्णसेवा व्यवस्थापनावर ताण वाढला आहे.
Government Hospital Bharti 2024
Government Hospital Bharti 2024: Due to the increasing number of patients, the pressure is increasing on the Class Two and Class Shri and Class IV staff who play an important role in the respective hospitals. As a result patients have to wait for hours for examination. In Govt hospitals only examination of patients is done by MD, MS, MBBS, BDS, orthopedic, heart, neurologist medical officers. 967 posts of this class are vacant. So patients have to wait for months or two months to get a date for surgery. There has been a four-fold increase in surgeries, medical tests and outpatient examinations in the government and municipal hospitals of the state in the last 15 years. But due to insufficient manpower, there has been a huge stress on the medical services. This situation has arisen due to non-filling of 12 thousand 423 vacancies sanctioned by direct service, promotion. Know More details about Government Hospital Vacancies, Government Hospital Vacancy 2024, Government Hospital Bharti 2024 at below:
राज्यातील सरकारी आणि पालिकांच्या रुग्णालयात गेल्या १५ वर्षांत शस्त्रक्रिया, वैद्यकीय चाचण्या तसेच बाह्यरुग्ण तपासणीत चार पटीने वाढ झाली आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे वैद्यकीय सेवेवर प्रचंड मोठा ताण निर्माण झाला आहे. सरळसेवेने, पदोनतीने मंजूर असलेली १२ हजार ४२३ रिक्त पदे न भरल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे संबंधित रुग्णालयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्लास टू आणि क्लास श्री आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. परिणामी रुग्णांना तपासणीसाठी तासन्तास वाट पाहावी लागते. सरकारी रुग्णालयात केवळ रुग्ण तपासण्याचे काम एमडी, एमएस, एमबीबीएस, बीडीएस, आर्थोपेडिक, हृदय, मेंदूतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जाते. ही क्लास बनची ९६७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी महिने दोन महिने तारीख मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. शस्त्रक्रियेची तारीख मिळल्यानंतर बेडसाठी, वैद्यकीय चाचण्यांसाठी आठवडा जातो. त्यानंतर उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी दाखल केल्यानंतर वॉर्डमध्ये नर्सिंगच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एका नर्सवर दोन विभागातील रुग्णांची जबाबदारी निश्चित केली जाते. असे प्रकार सर्रास सरकारी रुग्णालयांत दिसून येतात. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना अनेकदा सेवा देणाऱ्या नर्स आणि त्यांच्या अधिका-यांसोबत वाद घालावा लागतो.
सर्वच जिल्ह्य रुग्णालयांत हीच स्थिती
मुंबईत जेजे, केईएम, नायर या रुग्णालयांसह ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, रायगडसह इतर सर्वच जिल्ह्य रुग्णालयांत हीच स्थिती आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचार होत नसल्यास मुंबईत जेजे, केईएम रुग्णालयात जाण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकारी देतात. मात्र या णालयांची पायरी चढल्यानंतर रुग्णांचे अतोनात हाल होतात. सकाळी आलेल्या रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी कधी रात्री तर कधी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागते. त्यामुळे रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाइकांची मोठी परवड होते. हे लक्षात घेता आवश्यक पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.
• रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या लॅब तंत्रज्ञांचीही पदे रिक्त आहेत. रुग्णालयाच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या क्लास फोरच्या कर्मचाऱ्यांचे संख्याबळ अपुरे असल्याने शौचालयापासून रुग्णालयाच्या इमारतीपर्यंत स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येते. या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीवाची बाजी लावत सेवा दिली. मात्र ही पदे भरण्यासाठी सरकारला कोणतीही घाई नसल्याचे दिसते.
Jilha Rugnalaya Bharti 2023
राज्यातील जिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, तसेच औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र आता रुग्णालयांमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण होणार असून, औषधांच्या तुटवड्याचा प्रश्नही सोडविण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षांमध्ये रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना औषध आणि डॉक्टर आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सार्वजिनक आरोग्य विभागाअंतर्गत ३५० ग्रामीण आणि १९ जिल्हा रुग्णालये आहेत. मात्र अनेक वर्षांपासून या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि औषधांची कमतरता आहे. तसेच रक्ताच्या तपासण्याही खासगी प्रयोगशाळांमध्ये कराव्या लागत आहेत. नांदेडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयांमधील समस्या दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रथम औषधांचा पुरवठा आणि डॉक्टरांच्या नियुक्तीवर भर देण्यात आला असून, त्यापाठोपाठ अन्य सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयांमध्ये १७०० नव्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर २५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एमपीएससीकडून परवानगीही घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये परिचारिका, तंत्रज्ञ, कक्षसेवक, सफाई कामगार आदी पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. या पदांसाठीची परीक्षा प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे नवीन वर्षामध्ये रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांची समस्या दूर होण्याची शक्यता असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
औषधे खरेदीसाठी राज्य सरकाने स्थापन केलेल्या स्वतंत्र प्राधिकरणाकडून औषध खरेदीसंदर्भात नियोजन करण्यात येत आहेत. त्यानंतर निविदा काढण्यात येणार आहेत. औषध खरेदीची प्रक्रिया डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांना नियमित औषधे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
Government Hospital Bharti 2023 – After the death of 18 patients in Kalwa Hospital, it was decided to increase the manpower here. Accordingly, the recruitment process of 72 nurses was implemented in the month of August. Now the Municipal Corporation has decided to fill the posts of 100 nurses on contract basis for the next six months. Direct interview will be conducted for this on November 22.
कळवा हॉस्पीटलमध्ये झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यु नंतर येथील मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आॅगस्ट महिन्यात ७२ नर्सची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. आता पुढील सहा महिन्यांसाठी तब्बल १०० परिचारीकांची पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी त्यासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे.
कळवा रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि १५० च्या आसपास तज्ञ डॉक्टर आहेत. सध्या कळवा रुग्णालयात २१० नर्सेसची पदे मंजुर आहेत. त्यातील १८० पदे भरली गेली आहेत. त्यानुसार केवळ ३० पदे रिक्त असल्याचे सांगतिले जात आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात आरोग्य विभागाने ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याची केली होती. त्यासाठी राज्यभरातून ४०० हून अधिक उमेदवार थेट मुलाखतीसाठी हजर झाले होते. दरम्यान आता कळवा रुग्णालयावर पुन्हा ताण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता रुग्णालयाला जाणवू लागली आहे. त्या अनुषंगाने आता परिचारीकांची पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार जातीनिहाय तब्बल १०० पदे भरली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु ही कंत्राटी पद भरती केवळ सहा महिन्यांसाठी असेल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
येत्या २२ नोव्हेंबर २०२३ रोजी यासाठी थेट मुलाखत घेतली जाणार असून उमेदवारांनी महापालिका मुख्यालय पाचपाखाडी येथे मुलाखतीसाठी हजर राहावे असेही पालिकेने स्पष्ट केले. त्यातही कोवीड काळात महापालिकेकडे परिचारीका म्हणून सेवा दिलेल्या उमेदवारांस अधिक प्राधान्य दिले जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले. त्यातही सकाळी ११ वाजता थेट मुलाखतीचा कार्यक्रम सुरु होणार आहे. त्यानुसार ही पद भरती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्याल यासाठी असेल असेही पालिकेने स्पष्ट केले.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये विविध स्तरांवरील डॉक्टरांच्या मंजूर ५७ हजार ७१४ पदांपैकी २० हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची कबुली राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. त्यात विशेष अभ्यासक्रमाच्या (सुपर स्पेशालिटी) एक हजार ७०७ मंजूर पदांपैकी ८९३ पदे रिक्त असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
दुसरीकडे, रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून सार्वजनिक आरोग्य विभागाला सामान्य प्रशासन विभागाकडून भरतीसाठी आवश्यक मंजुरी मिळाली आहे. रिक्त पदे भरण्यासाठी विभागाने विभागीय पदोन्नतीद्वारे ४२२ पदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. १० हजार ९५९ पदांसाठी विविध स्तरांवर डॉक्टरांच्या भरतीसाठी, राज्यात एक लाख ५३ हजार ६७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठीची परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. औषधे आणि उपकरणे खरेदीची प्रदीर्घ प्रक्रिया कमी करण्यासाठी मे महिन्यात सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण स्थापन केले आहे. जून २०१७ पासून हाफकीन इन्स्टिट्यूटमधून औषधांची खरेदी केली जात असल्याचेही सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले.
ही रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचा दावाही सरकारने प्रतिज्ञापत्रात केला आहे. राज्याच्या आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यात, विभागाला अतिरिक्त अर्थसंकल्पीय वाटप आणि पूरक तरतूद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावाही सरकारने केला आहे. औषधे आणि उपकरणांच्या खरेदीकरिता २०२३-२४ या वर्षासाठी ८६७४.८५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचेही सरकारने म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील मृत्युसत्राची उच्च न्यायलयाने स्वतःहून दखल घेतली होती. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची, आरोग्यासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची आणि या रुग्णालयांत किती तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत याची प्राथमिक माहिती सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण या चार विभागांनी सरकारी वकील पी. पी. काकडे यांच्यामार्फत सोमवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
An affidavit filed by the state government in the High Court has revealed that a large number of posts of doctors and other staff in government hospitals are lying vacant. As many as 35,566 posts are lying vacant in various hospitals run by the department of public health and medical education, the government has admitted.
शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याचे विदारक सत्य खुद्द राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध रुग्णालयांमध्ये तब्बल ३५ हजार ५६६ पदे रिक्त असल्याची कबुली सरकारने दिली आहे.
पदे भरण्याची प्रक्रिया सुरू
- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यातील एकूण ७१ वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील प्रथम संवर्गापासून सवर्गासाठी ३६ हजार १४५ पदे मंजूर असून, १५ हजार १६४ पदे रिक्त असल्याचे मान्य केले.
- उच्च न्यायालयाने दुर्घटना घडलेल्या नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांतील रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला दिले होते. त्यानुसार, नांदेडमधील रुग्णालयात १.३४६ पदे मंजूर असून, ५६४ पदे रिक्त आहेत.
- अंतर छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात २,४३७ मंजूर पदे असून, ७९१ पदे रिक्त असल्याचे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ही सर्व पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सरकारने न्यायालयाला सांगितले.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात १ व २ ऑक्टोबरच्या मध्यरात्री २४ बालकांचा मृत्यू झाल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले. या प्रकरणी उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली. ६ ऑक्टोबरला न्यायालयाने सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची मंजूर पदे व रिक्त पदांची माहिती देण्याचे व रिक्त पदे भरण्यासाठी सहा महिन्यांपासून काय पावले उचलली, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रतिज्ञापत्रे सादर केली. सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक ते तृतीय स्तरातील रुग्णालयांत प्रथम संवर्गापासून चतुर्थ संवर्गापर्यंत एकूण ५७ हजार ७१४ पदे मंजूर करण्यात आली असून, ३७ हजार ३१२ पदे भरली असून, २० हजार ४०२ पदे रिक्त असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. ही पदे वर्षाअखेरपर्यंत भरण्याची हमी कोर्टाला दिली आहे.
After the death of 18 patients in the Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Thane on the same day, not only in Thane but also in the state, the health service has been exposed to various ‘diseases’. There is a shortage of doctors and nurses in most of the government hospitals. Apart from that, about 17 thousand 864 various posts including Director, Joint Director, District Medical Officer are vacant in the State Health Department under the process of Government Hospitals Jobs 2023. So Candidates are waiting to carry the Government Hospitals Bharti 2023 as soon as possible.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूनंतर केवळ ठाण्यातच नव्हे तर राज्यातील आरोग्यसेवेला विविध ‘आजार असल्याचे उघडकीस आले आहे. बहुतांश सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता आहेच. त्याशिवाय राज्याच्या आरोग्य विभागात संचालक, सहसंचालक, जिल्हा चिकीत्सकांसह सुमारे १७ हजार ८६४ विविध पदे रिक्त आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कळवा यथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची असताना तेथे ६०० हुन अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. अतिदक्षता विभागाची क्षमता ४० खाटांची असताना तेथे ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. प्रसुती विभागाची क्षमता ७० खाटांची असून तेथे ९० महिला आहेत. साधारणतः ७ ते ९ रुग्णांमागे केवळ १ डॉक्टर असे येथील प्रमाण आहे. मुंबई महापालिकेच्या के. ई. एम. नायर आणि सायन रुग्णालयामध्ये चतुर्थश्रेणी रामभरोसे रुग्णसेवा भाग – १ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. नियमानुसार एका कक्षामध्ये ४० रुग्ण अपेक्षित असतांना या ठिकाणी सरासरी १२० ते १५० रुग्णसंख्या आहे. ६ रुग्णांसाठी १ परिचारिका हे प्रमाण असताना पालीका रुग्णालयात १ परिचारकेवर ४० रुग्णांची जबाबदारी आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ५० हजार परिचारीकांची पदे रिक्त आहे.
पालघर जिल्हयाची निर्मिती होवून ९ वर्षाचा कालावधी उलटूनदेखील तेथे जिल्हा सामान्य रुग्णालय नाही. जिल्ह्यातील ग्रामीण डॉक्टरची कमतरता त्यातच सुविधांचा अभाव असल्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड सुरू आहे. दुसरीकडे रुग्णालयात औषधेही कमी प्रमाणात असल्यामुळे गरीब रुग्णांना खासगी मेडिकल दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहेत. त्याचा मोठा फटका रुग्णांच्या नातेवाईकांना बसत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची ४० टक्के पदे रिक्त आहेत. शल्यचिकित्सकांची ४९ पदे मंजूर असताना त्यापैकी ४० पदे रिक्त आहेत, अशी माहिती विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. डहाणू, जव्हार व कासा या उपजिल्हा रुग्णालयाकरीता मंजूर असलेल्या ४४ पदांपैकी १७ पदे रिक्त आहेत. मनोर, पालघर, बोईसर, तलासरी, वाणगांव, मोखाडा, विक्रमगड, वाडा व विरार येथील ग्रामीण रुग्णालयातील ४७ पदांपैकी १९ पदे रिक्त आहेत. तर मनोर येथे २०० खाटांचे ट्रामा केअर सेंटर उभारण्याचे काम प्रलंबित आहे. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत धोकादायक आहे. सदर रुग्णालयातील डॉक्टरांच्या मंजूर २० पदांपैकी १८ पदे रिक्त आहेत. तेथील रुग्णसेवा रामभरोसे आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे.
Government Hospital Bharti 2023 – Jilha Rugnalaya Bharti 2023 – 13 thousand 391 posts are vacant in government hospitals, dental colleges and 876 posts are vacant in Ayurveda colleges. Medical Education Minister Hasan Mushrif has assured that all the vacant posts in Group A and Group B will be filled by direct service and promotion. Minister Mushrif has replied to the pointed question raised regarding vacant posts in government hospitals in the state. So far, 91 posts of professors and 525 posts of assistant professors have been filled by direct service. 117 teachers in the faculty cadre have been appointed by promotion. The remaining vacancies are being filled under Government Hospital Bharti 2023.
राज्यातील सरकारी रुग्णालये, दंत महाविद्यालयांत १३ हजार ३९१ पदे रिक्त असून आयुर्वेद महाविद्यालयांत ८७६ पदे रिक्त आहेत. यातील गट अ व गट ब मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू असून येत्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांत रिक्त असलेल्या पदांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. सरळसेवेने आतापर्यंत प्राध्यापक संवर्गातील ९१, सहायक प्राध्यापक संवर्गातील ५२५ पदे भरण्यात आली आहेत. प्राध्यापक संवर्गातील ११७ अध्यापकांना पदोन्नतीने नियुुक्ती देण्यात आली आहे. तर उर्वरित रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
गट क संवर्गातील ५१८० पदे भरण्याकरिता टीसीएसआयओएन कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. गट ड संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने संबंधित संस्थेचे अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
MPSC मार्फत पदे भरणार
सरकारी आयुर्वेद महाविद्यालयातील सरळसेवेने भरावयाच्या अध्यापक संवर्गातील ११४ रिक्त पदांचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. याविषयीची मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले आहे. ही पदे भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत.
Government Hospital Vacancies :A total of 5000 posts in Government colleges and affiliated hospitals, Class 3 and 4 will be filled. It has been directed to make the services of nurses available through external sources till the regular recruitment of nurses, which has been objected by the Maharashtra State Nurses Association, Headquarters. Further details are as follows:-
राज्य शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्याच्या हेतूने आरोग्य सेवेसारख्या महत्त्वाच्या सेवेतील गट क व गट ड संवर्गातील पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद व होमियोपॅथिक महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न रुग्णालयांतील ५ हजार पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्यात आरोग्य सेवेशी संबंधित महत्त्वाच्या तांत्रिक पदांचा समावेश आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी ज्या दिवशी बेमुदत संप पुकारला त्याच दिवशी म्हणजे १४ मार्चला राज्य शासनाने शासकीय, निमशासकीय कार्यालयांत बाह्यस्रोतांमार्फत नोकरभरती करण्याचा आदेश जारी केला. त्यासाठी नऊ कंपन्यांच्या नियुक्तीस मान्यता दिली. त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षांनी शासकीय सेवेतील नोकऱ्यांच्या खासगीकरणास विरोध केला, तर हा निर्णय आधीच्या महाविकास आघाडी सरकारचा असल्याचा दावा करीत सत्ताधारी पक्षाकडून कंत्राटी नोकरभरतीचे समर्थन करण्यात आले. राज्य शासनाने कर्मचारी संघटनांनी संप पुकारला त्याच दिवशी नऊ खासगी कंपन्यांना मनुष्यबळ पुरवठा करण्यास मान्यता दिली असली, तरी त्या आधी दीड महिन्यांपूर्वी राज्यातील २७ वैद्यकीय, आयुर्वेद, हौमियोपॅथिक महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णांलयातील गट क व गट ड संवर्गातील ५ हजार ५६ पदे बाह्यस्रोतांमार्फत भरण्यास संमती दिली आहे. त्यासाठी येणाऱ्या १०९ कोटी ५२ लाख रुपये खर्चसही मंजुरी देण्यात आली आहे.
Government Hospital Bharti 2023
या कंत्राटी भरतीमागे २० ते ३० टक्के वेतनावरील खर्चकपातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या आदेशानुसार १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न १५ रुग्णालयांतील कंत्राटी नोकरभरतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, नंदूरबार, सातारा, उस्मानाबाद, बारामती, अलिबाग, सिंधुदुर्ग, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांचा समावेश आहे. या पदांमध्ये शिपाई, सफाई कामगार, सुरक्षारक्षक, प्लंबर, वीजतंत्री, दूरध्वनीचालक, यांबरेबरच लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य निरीक्षक, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, दंततंत्रज्ञ, रक्तपेढी सहाय्यक, एमआरआय. ईसीजी, इंटोस्कोपी तंत्रज्ञ, निर्जुतीकरण, क्षकिरण तंत्रज्ञ, इत्यादी वैद्यकीय सेवेशीसंबंधित तांत्रिक पदांचा समावेश आहे.
बाह्य स्रोताद्वारे परिचारिका पदभरतीस राज्यभरातून तीव्र विरोध करण्यात येत आहे. कायमस्वरूपी पदभरती करावी या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियमित पदभरती होईपर्यंत परिचारिकांच्या सेवा बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- सरकारी महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमधील (Government colleges and affiliated hospitals) वर्ग ३ व ४ संवर्गातील एकूण ४,४४५ पदे भरण्यात येणार आहेत.
- परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियमित पदभरती होईपर्यंत परिचारिकांच्या सेवा बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय लातूरने आक्षेप घेतला आहे.
- कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील १०० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय झाला आहे.
- मात्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत असलेली परिचारिकांची रिक्त पदे सरळ सेवेने न भरता १,७९६ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्याचे आदेश देण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
- परिचारिका रुग्णसेवेचा कणा मानला जातो.
- त्यांचा रुग्णसेवेशी प्रत्यक्ष संबंध आहे.
- म्हणून परिचारिकांची सेवा बाह्यस्रोताद्वारे न घेता तत्काळ कायमस्वरूपी पदनिर्मिती व पदोन्नतीवर पदभरती करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
Newly approved medical colleges, intensive care hospitals, new departments of hospitals should not be made operational without the appointment and recruitment of nurses. Previously, registered nurses were given temporary appointments so that the patient service would not be disrupted till permanent and regular recruitment. It should start again.
- कंत्राटी किंवा बाह्यस्रोताद्वारे परिचारिका उपलब्ध केल्यास रुग्णसेवेत गुणवत्ता राहणार नाही.
- त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प असल्याने, आर्थिक असुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न आहे.
- या बाबींचा गांभीर्याने विचार करून कायमस्वरूपी पदभरती किमान तीन महिन्यांत करण्यात यावी.
- अन्यथा, नाइलाजास्तव राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांना तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा संघटनेच्या राज्य अध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे व सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी दिला आहे.
Government Hospital Vacancies 2023
Government Hospital Vacancies : Instructions have been given to fill the vacancies in all government medical colleges and hospitals in the state through an external system. The posts to be filled on a contract basis include nurse, dietitian, ECG technician, MIR technician, pharmacist, x-ray technician and assistant, librarian, and dialysis technician. Further details are as follows:-
Maha Govt Hospital Bharti 2023
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील रिक्त पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न रुग्णालयांमधील ४ हजार ४४५ रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेमार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात परिचारिकांसह ४० हून अधिक पदांचा समावेश आहे. कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांमध्ये परिचारिका, आहारतज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, एमआयआर तंत्रज्ञ, औषधनिर्माता, क्ष किरण तंत्रज्ञ व साहाय्यक, ग्रंथपाल, डायलेसिस तंत्रज्ञ आदी पदांचा समावेश आहे.
- वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व दंत महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांतील रिक्त पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आधिपत्याखालील तसेच आयुष्य संचालनालयाच्या आधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमधील वर्ग तीन व वर्ग चार या संवर्गातील रिक्त पदे नियमितरीत्या भरेपर्यंत बाह्ययंत्रणेमार्फत सेवा उपलब्ध करून घेण्यास परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
- सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने त्यास मान्यता दिली.
- त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमधील ४ हजार ४४५ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- वैद्यकीय शिक्षण विभागाने १३ एप्रिल रोजी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना तसे पत्र पाठवून त्यासंबंधीची कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.
- त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील रिक्त पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Government Hospital Job Vacancy 2022
The posts to be filled on contract basis include Nurse, Dietitian, ECG Technician, MIR Technician, Pharmacist, X-ray Technician and Assistant, Librarian, Dialysis Technician.
- Nurse
- Dietitian
- ECG Technician
- MIR Technician
- Pharmacist
- X-ray Technician and Assistant
- Librarian
- Dialysis Technician
Government Hospital Vacancies : There are 113 vacancies for nurses in the government hospital in Ambajogai. This puts a strain on the available manpower. Swami Ramanand Tirtha Medical College and Rural Hospital at Ambajogai is a major support center for general patients.
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात परिचारिकांची 113 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण पडतोय. अंबाजोगाई येथील स्वामी रमानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय हे सामान्य रुग्णांसाठी मोठे आधार केंद्र आहे.
शासनाने तात्पुरत्या स्वरुपात जरी डॉक्टरांची पदे भरलेली असली तरी परिचारिकांची 113 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध परिचारिकांना रुग्णसेवा देताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने हि रिक्त पदे तत्काळ भरली, तर आरोग्यसेवा देताना होणारा मोठा ताण कमी होणार आहे.
Table of Contents
Government Hospital Bharti 2023 Latest
Hostel warden job 5 year’s experience
Mala hostel wardan job cha patch
Online from ksa bhrava