महाराष्ट्राचा नवीन अर्थसंकल्प सादर झाला असून यात 2100 रुपयांचे अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांच्या अनुदानाचा विचार सुरू आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी पाच वर्षे आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, आर्थिक शिस्त पाळून निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निश्चितच लाडक्या बहिणीसाठी हि एक आनंदाची बातमी आहे.
| ⏰महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५ वर आधारीत महत्वाचे प्रश्न, सर्व परीक्षेस उपयुक्त |

नवीन अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासाला गती
रस्ते, बंदरे आणि विमानतळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार आहे. वर्ल्ड बँक, एशियन बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून भांडवली गुंतवणूक केली जाईल. आगामी वीस वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे.
महिला सशक्तीकरणासाठी ‘लखपती दीदी’ योजना
लाडक्या बहिणींसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार ‘लखपती दीदी’ संकल्पना राबवत असून, आतापर्यंत 23 लाख महिलांना याचा लाभ झाला आहे. पुढील टप्प्यात 24 लाख महिलांना यात समाविष्ट करण्यात येणार आहे.
कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना
शेती क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यातील आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणूक वाढीला चालना
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आता सात लाख कोटींवर पोहोचला आहे. उद्योग वाढीला मदत करणाऱ्या धोरणांमुळे महाराष्ट्र स्टार्टअप आणि विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे. जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असून, आगामी काळातही ही वाढ कायम राहील, असा सरकारचा विश्वास आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















