ISRO VSSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!-Golden Opportunity at ISRO VSSC!
Golden Opportunity at ISRO VSSC!
इसरो मध्ये नोकरी मिळणं हे अनेकांचं स्वप्न असत! यातच आपल्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात (VSSC) विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2025 आहे. चला तर या बद्दलची पूर्ण माहिती बघूया.
भरतीसाठी उपलब्ध पद
या भरती अंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (भौतिकशास्त्र) या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार असून, 47,600 ते 1,51,100 पर्यंत पगार मिळू शकतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अर्हता
- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे
- एनसीईआरटीच्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयातून एकात्मिक पदव्युत्तर एम.एससी. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- किंवा भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / न्यूक्लियर फिजिक्स / उपयोजित भौतिकशास्त्र या विषयांमध्ये किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
- तसेच, मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Ed. किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये अध्यापनाचा अनुभव आणि प्रावीण्य असणे बंधनकारक आहे.
नोकरीसाठी ही आहे सुवर्णसंधी!
ISRO मध्ये काम करण्याची संधी मिळणे हे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते. जर तुम्ही आवश्यक पात्रता पूर्ण करत असाल, तर ही संधी सोडू नका. लवकरात लवकर vssc.gov.in वर जाऊन अर्ज करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका!