मित्रांनो, गोदरेज सारख्या नामांकित कंपनीमध्ये फक्त १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी चालून आली आहे. चालत तर या बद्दल माहिती बघूया! नवी मुंबई – दिनांक २५ जून रोजी गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडकडून विविध पदांसाठी थेट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ह्या मुलाखती शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी नवी मुंबईतील महापे येथील Country Inn & Suites by Radisson या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.

मशीन ऑपरेटर, क्वालिटी अँड स्पेशल प्रोसेस, फिटर अशा क्षेत्रांतील कुशल उमेदवारांसाठी गोदरेजमध्ये नोकरीची ही एक उत्तम संधी आहे. या भरतीअंतर्गत CNC Milling/VMC, CNC Turning, Turnmill, EDM/Wirecut, Cylindrical Grinder, Hydraulic Press अशा प्रकारच्या मशीन ऑपरेटरसाठी पदे उपलब्ध आहेत. तसेच NDT Inspector, QC Inspector, CMM Programmer, Lab Technician या क्वालिटी व स्पेशल प्रोसेस संबंधित पदांसोबतच Electroplater, Spray Painter, TIG/MIG Welder, Assembly Fitter, Testing Fitter, Bench Fitter, Maintenance Fitter अशी अनेक कुशल कामं देखील भरली जाणार आहेत.
या पदांसाठी इच्छुक उमेदवार किमान १०वी पास असावेत, तसेच त्यांनी ITI, NCVT किंवा मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आपली सर्व मूळ कागदपत्रं – शैक्षणिक प्रमाणपत्रं, अनुभवाचे दाखले, पगाराची माहिती आणि ओळखपत्र यांची मूळ व झेरॉक्स प्रत आणणं अनिवार्य आहे. जे उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस येऊ शकत नाहीत, त्यांनी आपले अर्ज पुढील ७ दिवसांच्या आत [email protected] या ईमेलवर पाठवावेत.
ही संधी गोदरेजसारख्या प्रतिष्ठित कंपनीत नोकरीसाठी अतिशय महत्त्वाची असून, पात्र उमेदवारांनी ही संधी नक्कीच दवडू नये. आमच्या नोकरीसंबंधित WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















