JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर ताण; मेडिकलमधील रिक्त पदे कधी भरणार ! | GMC Nagpur Bharti 2026

GMC Nagpur Bharti 2026

मध्य भारतातील हजारो गरजू रुग्णांसाठी महत्त्वाचा आधार असलेल्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) मनुष्यबळाचा प्रश्न आता न्यायालयात पोहोचला आहे. रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होत असताना, ही पदे आणखी किती काळ रिक्त ठेवणार, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केला आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला रिक्त पदे भरण्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच, यासंदर्भात येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवांसोबतच मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) समोर आले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता इतकी गंभीर आहे की, रुग्णांच्या नातेवाइकांनाच स्ट्रेचर आणि व्हीलचेअर ओढण्याची वेळ येत आहे. या पार्श्वभूमीवर मेडिकलमधील रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर आणि रजनीश व्यास यांच्यापुढे झाली. यावेळी न्यायालय मित्र अॅड. ईशा ठाकरे यांनी रुग्णालयातील रिक्त पदांची आकडेवारी न्यायालयासमोर सादर केली. त्यानुसार, तृतीय श्रेणीतील १२० तांत्रिक पदांपैकी ४९, तृतीय श्रेणीतील ७७ अतांत्रिक पदांपैकी ३३, तर चतुर्थ श्रेणीतील ५७५ पदांपैकी १७० पदे रिक्त आहेत.

दरम्यान, ‘लोकमत’ने ९ जून २०२६ रोजी यासंदर्भात सडेतोड वृत्त प्रकाशित करून कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णांच्या नातेवाइकांवर येणारा अतिरिक्त भार अधोरेखित केला होता. कर्मचाऱ्यांची मदत न मिळाल्याने स्ट्रेचर आणि व्हीलचेअर स्वतः ओढण्याची वेळ नातेवाइकांवर येत असल्याचे वृत्तात नमूद केले होते. इतकेच नव्हे, तर पायाला गंभीर दुखापत झालेल्या एका वृद्ध रुग्णाला मदतनीस उपलब्ध न झाल्याने फरशीवरून स्वतःला फरफटत न्यावे लागल्याची संतापजनक घटनाही उघडकीस आणली होती. या वृत्ताची दखल घेत न्यायालयाने सरकारी रुग्णालयांमधील समस्यांच्या निराकरणासाठी स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

मेडिकलमधील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जात असला, तरी शासनस्तरावर निर्णय होत नसल्याने रुग्णसेवेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. आवश्यक मनुष्यबळाअभावी रुग्णालयातील दैनंदिन कामकाजावर ताण येत असून, उपलब्ध कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. ही पदे भरण्यासाठी मेडिकल प्रशासनाने २ फेब्रुवारी २०२६ रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला पत्र पाठवले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे, या रुग्णालयात दररोज निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णसेवेचा वाढता ताण लक्षात घेता रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

GMC Nagpur Bharti 2026


वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का देणाऱ्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तूर्तास ब्रेक लावला आहे. गरजू नागरिकांसाठी आधारस्तंभ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापकांची तब्बल ६ पदे कमी करण्याचा निर्णय न्यायालयाने शुक्रवारी स्थगित केला.या पदकपातीसंदर्भातील सुधारित आकृतीबंधाला न्यायालयाने स्थगिती देत राज्य सरकारला २१ सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्राध्यापकांची पदे कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयावर आता न्यायालयीन हस्तक्षेपामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूर मेडिकलमधील शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापकांची सहा पदे कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अखेर न्यायालयीन ब्रेक लागला आहे. पदकपातीच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला अंतरिम स्थगिती दिली.या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी न्यायालय मित्र अॅड. ईशा ठाकरे यांनी राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्णयाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

वैद्यकीय शिक्षण विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी सुधारित आकृतीबंधासंदर्भात शासन निर्णय जारी केला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांमधील विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता विचारात घेऊन शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापक पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला. त्यानुसार नागपूर मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापकाचे एक, सहयोगी प्राध्यापकांची दोन आणि सहाय्यक प्राध्यापकांची तीन, अशी एकूण सहा पदे कमी करण्यात आली.या निर्णयाला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अध्यापक संघटनेने २१ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदनाद्वारे तीव्र विरोध केला होता. मात्र, संघटनेच्या विरोधानंतरही राज्य सरकारने आपला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे प्रकरण न्यायालयात पोहोचले. पदकपातीच्या निर्णयाचे प्राथमिक परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देत राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूर मेडिकलच्या अॅनाटॉमी विभागातील पदकपातीमुळे वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जुन्या आकृतीबंधानुसार विभागात २ प्राध्यापक, ५ सहयोगी प्राध्यापक आणि ८ सहाय्यक प्राध्यापक, अशी एकूण १५ पदे मंजूर होती. मात्र, नव्या आकृतीबंधात यातील तब्बल ६ पदे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

याशिवाय, विभागात वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदेही उपलब्ध नसल्याने ‘एनएमसी’च्या तपासणीत मेडिकलची मान्यता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पदकपातीचा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांच्या पदांपुरता मर्यादित न राहता वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेवरही परिणाम करणारा ठरू शकत होता.या गंभीर परिस्थितीकडे ‘लोकमत’ने २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘राज्यातील अॅनाटॉमीची २१ पदे रद्द; वैद्यकीय शिक्षणाचा ‘कणा’च मोडण्याचा घाट’ या वृत्तातून लक्ष वेधले होते. त्यानंतर न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पदकपातीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिल्याने वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

gmc nagpur


GMC Nagpur Bharti 2026: GMC Nagpur (Government Medical College and Hospital) has invited application for the posts of “Assistant Professor”. There are 16 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The Last Date of Applications is 11th of August 2026. Also candidates may attend the walk in interview on 19th of August 2026.  For more details about GMC Nagpur Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदाची 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२६ आहे. तसेच  पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर भरती 2026 करीता मुलाखतीची तारीख १९ ऑगस्ट २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर भरती 2026

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 40 वर्ष 
  • नोकरी ठिकाण – नागपुर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा /मुलाखतीचा  पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ ऑगस्ट २०२६
  • मुलाखतीची तारीख- १९ ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://gmcnagpur.org/

GMC Nagpur Super Specialist Vacancy 2026 

GMC Nagpur Bharti 2026

Salary Details For GMC SSH Nagpur Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय  अधिकारी1,00,000/-

How To Apply For GMC Nagpur Application 2026

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२६ आहे.
  •  नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

Selection Process For GMC Nagpur Notification 2026

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती १९ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For gmcnagpur.org Arj 2026

📑 शुद्धीपत्र
https://shorturl.at/xdsnh
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/pT4q5
✅ अधिकृत वेबसाईटhttps://gmcnagpur.org/

Table of Contents

1 thought on “रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर ताण; मेडिकलमधील रिक्त पदे कधी भरणार ! | GMC Nagpur Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड