महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाला योग्य त्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करीत असले तरी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय यांच्यासह शिपायांची सुमारे १६ हजारांवर पदे रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण राज्यातील ११ कोटींपेक्षा अधिक जनतेच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. यामधील बहुतांश लोक खासगी रुग्णालयात उपचार घेतात, मात्र अनेकांना खासगीत उपचार घेणे शक्य नसल्याने त्यांना शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा मोठा आधार आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य सुविधा देण्याला मोठे ग्रहण लागले असून आरोग्य व्यवस्थेवरील ताणही चांगलाच वाढला आहे. आजारी आरोग्य व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी रिक्त असलेली १६ हजार पदे भरण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील गट ड प्रवर्गात येत असलेल्या कर्मचाऱ्यांची पदे त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांची स्थापना करण्यात आली आहे. या नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे मंजूर पदांसोबतच रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
आरोग्य व्यवस्था जास्त प्रमाणात अडचणीत येउ नये म्हणून आवश्यक त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या हालचाली सुरू असून काही ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गट ब संवर्गातील रिक्त पदांपैकी प्राध्यापक संवर्गातील पदे तसेच वैद्यकीय अधिकारी संवर्गातील पदे करार तत्त्वाने भरण्याची प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणी ही पदे भरल्याची माहिती समोर आली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















