JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

जीएमसीतील १०१ रिक्त पदांची भरती लवकरच; उमेदवारांसाठी मोठी अपडेट! । GMC Akola Bharti 2026

GMC Akola Bharti 2026

GMC Akola Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरीची प्रतीक्षा संपणार! वर्ग ४ संवर्गातील १०१ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि संलग्न सर्वोपचार रुग्णालयातील वर्ग ४ संवर्गाची बिंदूनामावली शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही आस्थापनांमधील विविध रिक्त पदे भरण्याचा मार्ग खुला झाला असून, एकूण १०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या भरतीमध्ये सेवक, आरोग्यसेवक, आया, कक्षसेवक, परिचर, शिपाई, प्रयोगशाळा परिचर आदी पदांचा समावेश आहे. बिंदूनामावलीला मंजुरी मिळाल्याने आता या पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील नोकरीच्या संधींच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे लक्ष भरतीच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

मनुष्यबळाच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला आता मोठा दिलासा मिळणार आहे! नियमित कामकाजावर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी वर्ग ४ संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या भरतीचे नियोजन केले जात असून, संपूर्ण पदभरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे.शासनाने मंजूर केलेल्या बिंदूनामावलीनुसार विविध पदांचा भरतीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयातील सेवक, कक्षसेवक, आया, आरोग्यसेवक, परिचर आणि शिपाई, तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर व इतर संबंधित पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांमुळे निर्माण होणारा मनुष्यबळाचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे.

GMC Akola Bharti 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

 

Table of Contents

1 thought on “जीएमसीतील १०१ रिक्त पदांची भरती लवकरच; उमेदवारांसाठी मोठी अपडेट! । GMC Akola Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड