जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्यात ५ केंद्र सुरु, नोकरीची संधी, लाभ घ्या! – German Language training in pune

German Language training in pune

आताच आलेल्या बातमी नुसार भारतात उमेदवारांना जर्मनीत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य सरकारतर्फे मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार आहे. मात्र, युवकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर यांनी ही माहिती दिली.

चार लाख तरुणांना जर्मनीत रोजगार, मनुष्यबळ पुरविण्याबाबत नवीन करार – Germany Jobs for Indian

 

युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमरता असल्याने राज्यातील कुशल युवकांना युरोपीय देशांमध्ये नोकरी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी फेब्रुवारीमध्ये करार केला. त्या अंतर्गत बाडेन वुटेनबर्ग राज्याला कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्यातील गोएथे इन्स्टिट्यूट मॅक्समुलर भवन आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

German Language in Pune Jobs

पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीला विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ बाडेन वुटेनबर्ग या राज्यास उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ३० क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण झालेले विद्यार्थी खालील दिलेल्या लिंक द्वारे  नोंदणी करू शकतात. नोंदणी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना राज्य सरकारकडून मोफत जर्मन भाषेचे शिक्षण दिले जाणार आहे. त्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड येथे पाच प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असे वाटेकर यांनी सांगितले. एखाद्यावेळी बाडेन-वुटेनबर्ग राज्याचा अभ्यासक्रम आणि महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी, गरजेनुसार क्षेत्रनिहाय कौशल्यवृद्धीसाठी युवकांना सरकारकडून मोफत कौशल्यवृद्धीचे अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड