Flipkart Bharti 2026: भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून ऑनलाइन शॉपिंगची मागणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपनी Flipkartने देशभरात २.५० लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, यातील मोठा हिस्सा पहिल्यांदाच रोजगार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी उपलब्ध होणार आहे. फेस्टिव्ह सेलदरम्यान ऑर्डर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन फ्लिपकार्ट आपल्या वेअरहाऊसपासून ग्राहकांच्या घरापर्यंतच्या डिलिव्हरी नेटवर्कचा विस्तार करत आहे. फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, या रोजगार मोहिमेअंतर्गत सुमारे ७५ हजार पदांवर अशा उमेदवारांना संधी दिली जाणार आहे, जे पहिल्यांदाच वर्कफोर्सचा भाग बनणार आहेत. हे प्रमाण एकूण रोजगार संधींपैकी जवळपास ३० टक्के आहे. त्यामुळे पहिली नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी हा मोठा रोजगाराचा पर्याय ठरू शकतो. फ्लिपकार्टसोबतच इतर ई-कॉमर्स कंपन्यांकडूनही सणासुदीच्या हंगामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची भरती केली जात आहे. Amazon Indiaने देखील १.६ लाखांहून अधिक हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण केल्याचे वृत्त आहे. तर Meeshoने यंदाच्या सणासुदीच्या हंगामात १० लाखांहून अधिक हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
फ्लिपकार्टच्या नव्या रोजगार संधींमध्ये लास्ट-माइल डिलिव्हरी क्षेत्राचा सर्वात मोठा वाटा असणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, जवळपास ६० टक्के नवीन रोजगार, म्हणजेच सुमारे १.४ लाख संधी, ग्राहकांच्या घरापर्यंत वस्तू पोहोचवण्याशी संबंधित असतील. याशिवाय वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनी ९०० हून अधिक नवीन फेस्टिव्ह डिलिव्हरी हब सुरू करत आहे. विशेषतः टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये डिलिव्हरी नेटवर्कचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, फ्लिपकार्टच्या Flipkart Minutes या वेगवान डिलिव्हरी सेवांचा विस्तार होत असल्याने त्यासाठीही अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासणार आहे. फ्लिपकार्टच्या सप्लाय चेन वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभागही वाढत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, आता तिच्या सप्लाय चेनमध्ये २० टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला आहेत. त्यामुळे लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील रोजगारामध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये होणारी वाढ ई-कॉमर्स कंपन्यांसाठी मोठी संधी ठरत असतानाच त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवरही होत आहे. वेअरहाऊस, सॉर्टिंग, डिलिव्हरी, लॉजिस्टिक्स आणि ग्राहकांपर्यंत अंतिम वितरण अशा विविध क्षेत्रांमध्ये हंगामी मनुष्यबळाची मागणी वाढत आहे.
Flipkart Big Billion Days Sale 2026 – ‘या’ क्षेत्रांत सर्वाधिक नोकऱ्या
रोजचं कामकाज अधिक सुलभ करण्याबरोबरच स्थानिक समुदायाची प्रगती आणि आर्थिक विकास हे या वर्षीच्या सणासुदीच्या मोसमातलं उद्दिष्ट आहे. या अंतर्गत सप्लाय चेन विभागात. इन्व्हेंटरी मॅनेजर, वेअरहाऊस असोसिएट, लॉजिस्टिक्स कोऑर्डिनेटर, किराणा पार्टनर आणि डिलिव्हरी ड्रायव्हर्स यासारख्या अनेक संधी उपलब्ध होतील. याबाबत फ्लिपकार्टचे हेमंत बद्री म्हणाले, हा फ्लिपकार्टचा फक्त फ्लॅगशिप इव्हेंट नाही, तर त्या निमित्ताने सणासुदीच्या दिवसात सर्व घटकांना एकत्र आणण्याचा उत्सव आहे.
सप्लाय चेन नेटवर्कच्या विस्तारामुळे आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकू आणि त्यांना शॉपिंगचा उत्तम अनुभव मिळेल. आमच्या सक्षम, शाश्वत अशा सप्लाय चेन नेटवर्कमुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतीलच पण योग्य संधीच्या द्वारे आर्थिक विकास होईल. आम्ही सेवा देत असलेल्या समुदायावरही त्याचा दूरगामी परिणाम होईल. किराणा पार्टनर्सला यामुळे प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. सणासुदीच्या काळात संपूर्ण भारतात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आमचे कर्मचारी आमच्या सप्लाय चेन नेटवर्कचा कणा आहेत. या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवतोय आणि याचा आम्हाला गर्व आहे. डिलिव्हरीचा वेग, कार्यक्षमता वाढवून भारताततील इ-कॉमर्स क्षेत्रात क्रांती आणायची हे आमचं उद्दिष्ट आहे
Flipkart Jobs – Eligibility Criteria
सीनिअर डेव्हऑप्स इंजिनीअर (Senior DevOps Engineer)
- – डेव्हलपमेंट विभागात अत्यंत वेगाने हालचाली, घडामोडी घडत असतात. त्यात सक्रियपणे सहभागी होणारा उमेदवार कंपनीला हवा आहे.
- – CI/CD टूलसेट्स आणि ऑटोमेशनचा वापर करून डेव्हऑप कॅपॅबिलिटीजवर लक्ष ठेवू शकणारा, डिझाइन करू शकणारा, त्यांची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करू शकणारा उमेदवार
- – सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना नवा कोड रोलआउट करणं आणि नवी फीचर्स टेस्ट करणं सोपं व्हावं, यासाठी त्यांच्यासोबत काम करू शकणारा उमेदवार
- – गुगल क्लाउड, टेराफॉर्म, अन्सिबल, कुबरनीट्स यांच्यासोबत कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर रन करू शकणारा उमेदवार
- – आउटेजवर नव्हे, तरलक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणारा आणि वेळीच अलर्ट देऊ शकणारा उमेदवार
- – प्रत्येक कृतीचं डॉक्युमेंटेशन करू शकणारा उमेदवार हवा आहे, जेणेकरून पुनःपुन्हा करता येऊ शकणाऱ्या कृती शोधता येतील आणि ऑटोमेशन करता येईल.
- – कंपनीच्या Prometheus, NewRelic Monitoring मध्ये सुधारणा करणं किंवा नवं मेट्रिक्स उभारणं शक्य असलेला उमेदवार
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर (Software Development Engineer)
- – कोणत्याही एका प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सखोल अनुभव आणि तज्ज्ञता आवश्यक. स्ट्राँग OO Skills आवश्यक.
- – जावा, रुबी, क्लोजर, स्काला, सी, सी प्लस प्लस, एसक्यूएल यांपैकी कोणत्याही किमान एका जनरल प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सखोल अनुभव हवा.
- – कम्प्युटर सायन्सचा पाया पक्का हवा. डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम, सॉफ्टवेअर डिझाइन आदी बाबींमध्ये तज्ज्ञता हवी.
- – गुंतागुंतीचे आणि इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स सोडवण्याची आवड हवी.
- – कमिटमेंट, ओनरशिप आदी गुण स्टार्ट-अपसारख्या वातावरणात कामाचा अनुभव हवा.
- – बीटेक, एमटेक, कम्प्युटर सायन्स किंवा संबंधित तांत्रिक शाखेत पीएचडी
- – उत्तम कोडिंग स्किल्स. डिझाइन कोडमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता आणि प्रभुत्व, युनिट आणि इंटिग्रेशन टेस्ट्स लिहिण्याचं चांगलं कौशल्य (कोड आणि इंटरफेसेसच्या रीझनेबल कव्हरेजसह) आवश्यक.
इच्छुक तंत्रज्ञ या संदर्भात फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात आणि अर्जही करू शकतात.
Previous Post –
Flipkart Jobs 2026
Flipkart दिल्ली, कर्नाटक, बिहार आणि इतर प्रदेशांमध्ये WFH 2026 मॉडेलसह विविध भूमिकांसाठी भरती करत आहे. ई-रिटेलर कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल. भरती प्रक्रिया व्हर्च्युअल पद्धतीने केली जाईल म्हणजेच मुलाखती ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील. Flipkart 2026 ने सांगितले की त्यांची कंपनी नेहमीच योग्य लोकांच्या शोधात असते आणि पात्र लोकांची दखल घेतली जाते. ग्राहक हे त्यांचे पहिले प्राधान्य असून त्यांची उत्पादने आणि सेवा या तत्त्वावर आधारित असतील. लोकांच्या कलागुणांना कामाच्या ठिकाणी आणखी वाढवता येते आणि मजबूत नेतृत्वगुण असलेले लोक संस्थेत प्रगती करू शकतात, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.
- कंपनीच्या धोरणानुसार, प्रतिनिधींना अधिक चांगली संधी दिली जाईल जेणेकरून ते कामात नावीन्य आणू शकतील.
- निवेदनात म्हटले आहे की कंपनीच्या कर्मचार्यांना अशा प्रकारे काम करावे लागेल की कंपनी स्पर्धात्मक आणि बाजारातील परिस्थितीशी सुसंगत राहू शकेल.
- त्यामुळे फ्लिपकार्टमध्ये नॊक्ररीची सुवर्णसंधी फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना असणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















