PM Cares Fund च्या बनावट वेबसाइट
Fake ID PM Cares Fund
Beware! Fake ID PM Cares Fund – लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने धडक कारवाई केली आहे. लॉकडाऊनमध्ये राज्यातील विविध शहरात ७८ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसह पुण्यासारख्या प्रमुख शहरातील गुन्हागारांवर सायबर गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. PM Cares Fund च्या बनावट वेबसाइट तयार करून पैसा लुबाडत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सायबरने लोकांना सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांना कोरोना महामारीच्या उपचाराकरिता देणगी द्यायची आहे त्यांनी भारत सरकारच्या pmcares फंड करता देणगी देताना pmcares@sbi या अधिकृत लिंकचाच वापर करावा, अशी विनंती सायबर सेलने केली आहे.
pmcarefund@sbi, pm.care@sbi, pmcare@sbi, pncare@sbi ,pncares@sbi pmcares@pnb, pmcares@upi, pmcaress@sbi, pmcares@hdfc अशा प्रकारच्या खोट्या लिंक देऊन ऑनलाइन फसवुणुकीचा खोडसाळपणा सुरु केला आहे .तरी सर्व नागिरकांनी अशा खोट्या लिंकचा अजिबात वापर करू नये, असे अवाहनही सायबर सेलकडून करण्यात आले आहे.