Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

Police Patil Bharti List Of Documents Required

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Patil Bharti List Of Documents Required – Students all we Know That Maharashtra Police Patil Bharti has been Published. Many candidates in Maharashtra State is eagerly waiting for this Police Patil Bharti Exam 2023. We have already Given You Police Patil Bharti Study Material like Police Patil Bharti 2023 Syllabus, Police Patil Bharti Old Question Paper, Police Patil Bharti Expected Question Paper 2023 and other Important Information Regarding Talathi. Now in This article You will get details about Documents Required For Police Patil Bharti, List Of Documents Required for Police Patil Exam 2023. Check Official Police Patil Bharti Document List and Download  Police Patil Documents Required, List of Documents in Marathi for future reference :

Applicants must attach the following supporting documents along with their application. And original documents must be submitted at the time of interview.

महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

महाराष्ट्र पोलीस पाटील भरती प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक उमेदवार या पोलीस पाटील भरती परीक्षेची 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्ही तुम्हाला पोलीस पाटील भरती 2023 अभ्यासक्रम, पोलीस पाटील भरती जुनी प्रश्नपत्रिका, पोलीस पाटील भरती अपेक्षित प्रश्नपत्रिका 2023 आणि इतर महत्त्वाचे अभ्यास साहित्य आधीच दिले आहे.आता या लेखात तुम्हाला पोलीस पाटील भरती साठी आवश्यक कागदपत्रे, पोलीस पाटील परीक्षा 2023 साठी आवश्यक कागदपत्रांची यादी बद्दल तपशील मिळेल. अधिकृत पोलीस पाटील भरती दस्तऐवज यादी तपासा आणि पोलीस पाटील आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करा, भविष्यातील संदर्भासाठी :

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

पोलीस पाटील पदाची निवड पद्धत | Police Patil Document List PDF

मित्रांनो पोलीस पाटील पदाची निवड पद्धत महाराष्ट्र पोलीस खात्यामार्फत होते.
परीक्षेसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागते.
मुलाखत.
त्यानंतर उमेदवाराची कौशल्य चाचणी होते.

List Of Documents Required For Maharashtra Police Patil Exam 2023

अर्जदार व्यक्तीने त्यांचे अर्जासोबत खालीलप्रमाणे पुराव्याची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. व मुलाखतीचेवेळी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

1. शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्याच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती.
2. माध्यमिक शालांत परिक्षा प्रमाणपत्राची सत्यप्रत.
3. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याच्या दाखल्याची किंवा जन्म तारखेच्या दाखल्याची सत्यप्रत.
4. संबंधीत गावचा स्थानिक रहिवाशी असलेबाबत तहसिलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीकडील घर कर आकारणी पत्रक किंवा शेतजमीन असलेस 7/12 उतारा व 8 अ उतारा मुळ
प्रत इत्यादी.
5. आरक्षित संवर्गातील अर्जदाराने पुरावा म्हणून सक्षम प्राधिकारी यांचे दिलेले जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती वगळून उर्वरित आरक्षण संवर्गासाठी खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणसह ) उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचेकडील नॉन क्रिमीलेअर (NCL) प्रमाणपत्राची सत्यप्रत.
6. सरकारी थकबाकीदार नसलेबाबत तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला.
7. कोणत्याही गुन्हयात दंड अगर शिक्षा झाली नसलेबाबत आणि पोलीस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगली असलेबाबत संबंधित पोलीस निरीक्षक/सहा. पोलीस निरीक्षक यांचा दाखला.
8. अर्जदाराने स्वतःचे पासपोर्ट आकाराचे अलीकडील काळात काढलेले दोन फोटो (दोन फोटोपैकी एक राजपत्रीत अधिकारी यांचेव्दारा साक्षांकीत ) अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी चिकटविणे
9. अर्जासोबत राखीव प्रवर्गातील अर्जदारांनी रु.300/- व खुला प्रवर्गातील अर्जदारांनी रु.500/- परीक्षा शुल्क अर्जासोबत देणे आवश्यक आहे. सदरचे परिक्षा शुल्क हे ना परतावा असलेने परत मिळणार नाही.
10. अर्जदार यांनी लहान कुटूंबाचे (दोन अपत्ये) असलेबाबत तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे केलेले प्रतिज्ञापत्र. (प्रतिज्ञापत्राचा नमुना सोबत जोडला आहे.)

निवड झालेल्या उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे | List Of Documents Required For Police Patil

1. शारिरीक दृष्ट्या सक्षम असलेबाबतचा जिल्हा शल्य चिकीत्सक सांगली यांचेकडील प्रमाणपत्र 1 महिन्याचे आत सादर करणे बंधनकारक आहे.
2. निवड झालेल्या राखीव संवर्गातील अर्जदारांनी 6 महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे । बंधनकारक राहील.
3. कोणत्याही गुन्हयात दंड अगर शिक्षा झाली नसलेबाबत आणि पोलीस पाटील पदासाठी चारित्र्य व । वर्तणूक चांगली असलेबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांचा दाखला 1 महिन्याचे आत सादर करणे । बंधनकारक आहे. उपरोक्त नमूद केलेली 1 ते 3 कागदपत्रे अर्जदारांनी मुदतीत सादर न केलेस झालेली निवड रद्द करणेत येईल. जर एखादी नियुक्ती चुकीच्या अथवा खोट्या सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे झाली आहे । किंवा विहित नियमांचे व आदेशांचे पालन न करता झाली आहे असे निदर्शनास आल्यास झालेली | नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना राहतील.

Police Patil Bharti Helpline Number

ऑनलाईन अर्ज भरण्यास काही तांत्रिक अडचण आल्यास
1)77200 85666
2)98222 33628
अन्य अडचणी साठी कार्यालयास संपर्क साधावा

Leave a Comment