JOIN Telegram

११ गावात होणार आशा सेविका लेखी परीक्षा २४ एप्रिलला; जाणून घ्या परीक्षा पॅटर्न | Asha Sevika Written Exam Date 2023

Asha Sevika Written Exam Date 2023

Asha Sevika Written Exam Date 2023: Asha Sevika Bharti Exam dates are Out ! Those candidates who are applying For Asha Sevika Must Know about Asha Sevika Exam Pattern, and Asha Sevika Syllabus 2023. In this article, you will find what is the syllabus and Exam Pattern For Asha Swayamsevika Exam 2023. As per the latest News Asha Sevikas Exam will be held on 24th April 2023. Asha Sevika Written exam is of 150 marks and the Essay of 50 marks is of total 200 marks. Sarpanch, Secretary, Asha- Health Nurse, and Medical Officer, will be the examiners for the oral examination and they will give 25 marks each. Higher education will be given priority and widows, widowed women will be given additional 15 marks.

प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी अंतर्गत येणाऱ्या काही गावांत आशा कार्यकर्ता निवड प्रक्रिया सुरू झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपलाच नंबर लागावा म्हणून काही विशिष्ट अधिकारी पदाधिकाऱ्यांमार्फत साकडे घालण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. दरम्यान, ही निवड प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.  अर्ज करण्याची तारीख १७ ते २२ एप्रिल असून लेखी परीक्षा २४ एप्रिलला पार पडणार आहे.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी यांच्या १७ एप्रिल २०२३ सरपंच, सचिव यांना पाठविलेल्या पत्रानुसार आशा स्वयंसेविका योजना २०२२-२३ अंतर्गत आशा स्वयंसेवकांची नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी अंतर्गत सौंदड, बोपाबोडी, पुटाळा फुटाळा (शास्त्री वॉर्ड), खोडशिवनी, घाटबोरी/को, तिडका, पलसगाव, राका, चिखली, कोकणाटोली अशा एकुण अकरा गावामध्ये आशा कार्यकर्ता निवड करावयाची आहे. निवड प्रक्रिया ही निष्पक्ष प्रमाणिक होईल यांची पूरेपूर काळजी घ्यावी. जेणेकरून सुयोग अशा आशा कार्यकर्ता गावाच्या सेवेत आपले योगदान देवू शकेल, यासाठी विशिष्ट निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अर्ज करण्याची तारीख १७ ते २२ एप्रिल असून लेखी परीक्षा २४ एप्रिलला पार पडणार आहे.

Asha Swayamsevika Written Exam Date 2023

किमान दहावी पासची अट

आशा सेविकेसाठी वयोमर्यादा २५ ते ४५ असुन किमान १० वी पास असणे आवश्यक आहे.

Asha Swayamsevika Exam Pattern 2023

  • लेखी परीक्षा १५० गुणांची असून ५० गुणांची निबंधलेखन असे एकूण २०० गुण आहेत.
  • तोंडी परीक्षेसाठी सरपंच, सचिव, आशा- आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी, परीक्षक म्हणून राहणार असून प्रत्येकी २५ गुणदान करणार आहेत.
  • उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असून विधवा, परितक्त्या महिलांना अतिरिक्त १५ गुण देण्यात येणार आहेत.

सरपंच व पदाधिकाऱ्यांना साकडे

तोंडी परीक्षेसाठी सरपंच, ग्रामसेवक, आशा आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी परीक्षक असल्याने स्थानिक कार्यकत्यांनी आपला नंबर लागावा म्हणून अधिकारी पदाधिकाऱ्यांकडे साकडे घालण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. ग्रामीण आरोग्य अभियानात आशा ही आरोग्य विभाग व ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून निष्पक्ष निवड करून सुयोग्य आशा स्वयं- सेविकांची निवड व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड