Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंजिनीअरिंगच्या राज्यात ४५ टक्के जागा रिक्त

Engineering Admission 2021

Engineering Admission 2021 : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया पूर्ण झाल्यानंतर इंजिअनीअरिंग अभ्यासक्रमाच्या सुमारे ४५ टक्के जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. तर यंदा व्यवस्थापन विषयाच्या सुमारे ३३ टक्के जागा रिक्त राहिल्याचे चित्र समोर आले आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यातील इंजिनीअरिंगसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रवेश प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. इंजिनीअरिंगच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण यंदाही कायम आहे. मात्र, यंदा राज्यात बंद केलेली काही कॉलेजे त्यामुळे कमी झालेल्या जागा लक्षात घेता रिक%0त जागांच्या प्रमाणात अल्पशी घट झाली आहे. यंदा सरकारी शिक्षण संस्थातील बहुतांश जागा भरल्या आहेत. मात्र, विनाअनुदानित संस्थात निम्याहून अधिक जागा रिकाम्या राहिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. राज्यभरातील ३३१ संस्थात यंदा एक लाख २३ हजार ८९५ जागा होत्या. त्यापैकी ६८ हजार ४५१ जागांवर प्रवेश झाले आहेत. तर तब्बल ५५ हजार ४४४ जागा रिक्‍त राहिल्या आहेत. जागा रिक्‍त राहण्याचे प्रमाण ४४.७५ टक्के इतके आहे, तर गतवर्षी हे प्रमाण ४८ टक्के होते. गेल्या काही वर्षापासून इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मागणी कमी होत आहे. यंदा तर कोरोनाकाळात प्रवेश प्रक्रिया काही काळ लांगली. असे असले तरी सरकारी कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले असल्याचे दिसून आले. विनाअनुदानित संस्थातील प्रवेशाची स्थिती भयावह आहे. राज्यभरात ३१० संस्था विनाअनुदानित आहेत. या संस्थात तब्बल एक लाख १७ हजार २३४ जागा आहेत. त्यापैकी केवळ मागणी असलेल्या अभ्यासक्रम धरुन ६२ हजार ५६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर या संस्थांत ५४ हजार ६६७ जागा रिक्‍त राहिल्या आहेत, तर शासकीय ९ संस्थात असलेल्या तीन हजार २७० जागापैकी २ हजार ९७९ जागांवर प्रवेश झाले आहेत. तर २९१ जागा रिकामी झाल्या आहेत.

इंजिनीअरिंग पदव्युत्तरलाही जागा रिक्त – Engineering Admission 2021

इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना ‘एमई’च्या १९६ असलेल्या संस्थात १२ हजार ४५६ इतक्या जागा होत्या. त्यापैकी पाच हजार ५७९ जागावर प्रवेश झाले आहेत. तर ६ हजार ८७७ जागा रिक्‍त राहिल्या आहेत. रिक्‍त जागा राहण्याची टक्केवारी ५५.२१ टक्के इतकी आहे.

‘व्यवस्थापन’च्या जागाही रिक्त

यंदा व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या सुमारे १० हजार ६०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. व्यवस्थापनासाठी ३१५ संस्थांमध्ये ३२ हजार २७९ जागा आहेत. या जागांवर २१ हजार ६७३ प्रवेश झाले तर १० हजार ६०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. व्यवस्थापन शाखेला एवढ्या जागा रिक्त राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


Engineering Admission 2020 : एआयसीटीईने इंजिनीअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

Engineering Admission 2020 : ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) इंजिनीअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ सप्टेंबरपासून, तर नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तसेच या वेळापत्रकानुसार राज्यांना पहिली गुणवत्ता यादी २० ऑक्टोबरपूर्वी जाहीर करावी लागणार आहे.

Engineering Admission 2020

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेजे बंद आहेत. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर होत आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर आवश्यक जेईई सप्टेंबरमध्ये होणार आहे, तर राज्यांनाही आता त्यांच्या प्रवेश परीक्षा सप्टेंबर महिन्यातच पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. कारण परिषदेने दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार २० ऑक्टोबरपूर्वी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी १ नोव्हेंबरपर्यंत जाहीर करावी लागणार आहे. तर इंजिनीअरिंगचे वर्ग हे १ नोव्हेंबरपासून सुरू करावेत असेही परिषदेने सूचित केले आहे. यामुळे राज्य सरकारना १ नोव्हेंबरपर्यंत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्ण करावे लागणार आहे.

आता राज्य सरकार इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेबाबत काय निर्णय घेते यावर पुढील प्रक्रिया अवलंबून असणार आहे. सरकारला प्रवेश परीक्षेबाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. आता तरी सरकारने लवकरात लवकर प्रवेश परीक्षेबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

मुक्त शिक्षण दोन सत्रांत

विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त शिक्षण दोन सत्रात घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश विद्यार्थी मुक्त शिक्षणाकडे वळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त शिक्षणात प्रवेश घेताना या शिक्षणाचा कालावधी हा १२ महिन्यांचा असणे आवश्यक आहे असे स्पष्ट करत यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर व फेब्रुवारी-मार्च अशा दोन सत्रांत विद्यार्थ्यांना प्रेवश द्यावेत असे सूचित केले आहे. यानुसार तंत्र शिक्षण परिषदेनेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मुक्त शिक्षण सत्र दोन सत्रांत घेण्याचे ठरविले आहे. यानुसार पहिल्या सत्रांतील प्रवेश ३० ऑगस्टपूर्वी, तर दुसऱ्या सत्रातील प्रवेश २८ फेब्रुवारी २०२१ पूर्वी होणे बंधनकारक असणार आहे.

नवीन वेळापत्रक

  • सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे नव्या शैक्षणिक वर्ष : १ सप्टेंबर
  • पहिली प्रवेश फेरी : २० ऑक्टोबरपूर्वी
  • दुसरी प्रवेश फेरी : १ नोव्हेंबरपूर्वी
  • नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात : १ नोव्हेंबर
  • प्रवेश रद्द करण्याची मुभा : १० नोव्हेंबर
  • रिक्त जागांवर प्रवेश : १५ नोव्हेंबरपर्यंत

     

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड