Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पेसा भरतीसाठी ग्रामसेवक दाखल्याची अट आता शिथिल | Ekatmik Adivasi Vikas Prakalp

Ekatmik Adivasi Vikas Prakalp

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Bharti 2023

Ekatmik Adivasi Vikas Prakalp : For the recruitment of employees in the field of salary, the government has made a condition of salary certificate. To get this certificate, the tribal youth have to fill many documents while submitting the proposal to the project office. It has been stipulated that the certificate of Gram Sevak should be attached with the proposal. As the Gram Sevak was reluctant to give this certificate, the candidates faced a big problem. In this regard, a delegation of the organizations Students Federation of India and Birsa Brigade met the project officer at Ghodegaon and submitted a statement regarding easy access to the Pesa ID card.

पेसा क्षेत्रातील नोकर भरतीसाठी शासनाकडून पेसा दाखल्याची अट घालण्यात आली आहे. हा दाखला मिळवण्यासाठी आदिवासी तरुणांना प्रकल्प कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. त्यातच ग्रामसेवकाचा दाखला प्रस्तावासोबत जोडावा, ही अट घालण्यात आली आहे. ग्रामसेवक हा दाखला देण्यास टाळाटाळ करत असल्याने उमेदवारांची मोठी अडचण निर्माण झाली होती. यासंदर्भात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि बिरसा ब्रिगेड या संघटनांच्या शिष्टमंडळाने घोडेगाव येथे प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन पेसा दाखला सुलभतेने मिळण्याबाबत निवेदन सादर केले असून, पेसा दाखला मिळण्यासाठी ग्रामसेवकाच्या दाखल्याची आवश्यकता नसल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने नुकतीच प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले आहे. त्यासोबतच बिरसा ब्रिगेड या संघटनेने याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या दोन्ही संघटनांच्या निवेदनाची दखल घेत आता पेसा क्षेत्रातील दाखला मिळण्यासाठी ग्रामसेवकाच्या दाखल्याची गरज नाही, असे प्रकल्प कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी एसएफआयचे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे आंबेगाव तालुका सचिव समीर गारे जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, पुणे शहर अध्यक्ष अक्षय निर्मळ, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी, जिल्हा , समिती सदस्य राजू शेळके आदींसह , विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

दाखल्याचा अट्टहास नाही

बिरसा ब्रिगेड आणि स्टुडंट फेडरेशन या संघटनांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून प्रकल्प कार्यालय व सीईओ कार्यलय यांच्यात समन्वय घडवून आणला. चर्चेतून या दाखल्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे पेसा दाखल्याची मागणी करताना ग्रामसेवकाचा दाखला जोडण्याची आवश्यकता राहिली नाही यासाठी आंबेगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाकुंज यांनीही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी दिली आहे.


Ekatmik Adivasi Vikas Prakalp Chandrapur Bharti 2023

Ekatmik Adivasi Vikas Prakalp: In the government schools under the Integrated Tribal Development Project, Chandrapur, for the session 2023-24, higher secondary teachers, secondary teachers, primary teachers and graduate primary teachers are to be appointed on hourly basis as per the government decision. For this, applications are invited from interested and qualified candidates. The last date for filling the said application will be 15th May 2023.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय शाळांमध्ये सत्र 2023-24 करीता घड्याळी तासिका तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षकांची शासन निर्णयानुसार नेमणूक करावयाची आहे. याकरीता इच्छुक अहर्ता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 मे 2023 पर्यंत राहील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उच्च माध्यमिक शिक्षक या पदाकरीता इंग्रजी, मराठी, गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र या विषयासह एम.ए., एम.एससी, बी.एड शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असावी. माध्यमिक शिक्षक पदाकरीता विज्ञान, गणित, इंग्रजी व मराठी विषयासह बी.एससी बी.एड, प्राथमिक शिक्षक पदाकरीता सर्व विषय घेता यावे यासह बी.ए. डि.एड तर पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाकरीता मराठी व इंग्रजी विषयासह बी.ए. डी.एड शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असावी. मानधन शासन निर्णयानुसार देय राहील.

पदाकरीता अटी व शर्ती :
आश्रमशाळेच्या 20 किलोमीटर परिसरातील स्थानिक उमेदवारांना शैक्षणिक अहर्ता व अनुभवानुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या पत्रानुसार, आवश्यकतेनुसार भरावयाची पदे कमी/अधिक करण्याचे तसेच इतर बाबतीत वेळेवर बदल करण्याचे, भरती प्रक्रिया रद्द करण्याचे तसेच पदे संपुष्टात आणण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांना राहील. असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एस.जी.बावणे यांनी कळविले आहे


Ekatmik Adivasi Vikas Prakalp 

Ekatmik Adivasi Vikas Prakalp : Project Officer, Integrated Tribal Development Project Various offices are inviting applications for various schemes for the beneficiaries of Scheduled Tribes for Pune, Kolhapur, Satara, Sangli and Gadchiroli districts. For more details as follows:-

Special Central Assistance 275 (1) Scheme 2021-22 | Central Budget Scheme 2021-22

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विविध कार्यालयांतर्गत विशेष केंद्रीय साहाय्य भा.स.अ. 275 (1) योजना 2021-22 व केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना 2021-22 अंतर्गत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व गडचिरोली जिल्ह्यांकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • योजनांचे नाव – विशेष केंद्रीय साहाय्य भा.स.अ. 275 (1) योजना 2021-22 व केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना 2021-22
  • जिल्हे – पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व गडचिरोली
  • वयोमर्यादा –  18 वर्षे पूर्ण
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 & 20 फेब्रुवारी 2022

Important Links For Ekatmik Adivasi Vikas Yojna

? PDF जाहिरात (गडचिरोली जिल्हा)
https://bit.ly/3GnjJ4X
? PDF जाहिरात (पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली)
https://bit.ly/3HsXsUE
✅ अधिकृत वेबसाईट
tribal.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड