ECIL मध्ये २३४ पदांची भरती सुरु ! 16 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज!
ECIL Vacancies 2021 Details & Updates – नवीन अपडेट – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited – ECIL), भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत (Department of Atomic Energy, Government of India) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने 243 पदांसाठी अर्ज मागविले केले आहेत. कंपनीने जारी केलेल्या जाहिरात क्रमांक 29/2021 नुसार, 243 आयटीआय अप्रेंटिस (ITI Apprentice) विविध ट्रेडमध्ये भरती पक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 नुसार केली जाईल आणि अप्रेंटिसशिपचा कालावधी एक वर्ष असेल, जो ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे.
असा करा अर्ज
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ITI अप्रेंटिसशिपसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट ecil.co.in वर दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. तथापि, उमेदवारांना कंपनीच्या वेबसाइटवर अर्ज करण्यापूर्वी भारत सरकारच्या apprenticeship portal, apprenticeshipindia.org वर नोंदणी करावी लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर 2021 रोजी सुरू झाली आहे आणि उमेदवार 16 सप्टेंबर 2021 च्या सायंकाळी 4 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी डाउनलोड करावी आणि त्यांच्या अर्जाचा अनुक्रमांक देखील नोंदवावा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जाणून घ्या पात्रता
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ITI अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (ITI) कडून संबंधित ट्रेडमध्ये NCVT प्रमाणपत्र घेतलेले असावे. तसेच, 14 ऑक्टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओबीसी उमेदवारांसाठी कमाल वय 28 वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी 30 वर्षे आहे.