मित्रांनो, आपल्यासाठी एक महत्वाचा अपडेट जाहीर करण्यात आला आहे, जर आपण रेशनकार्ड धारक आहेत तर आपल्यासाठी हि महत्वाची बातमी आहे. भारत सरकारकडून राशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. देशभरातील सर्व पात्र राशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया जर तुम्ही ३० जून २०२५ पूर्वी पूर्ण केली नाही, तर तुमचं नाव राशन योजनेच्या लिस्टमधून काढून टाकलं जाईल. परिणामी, तुम्हाला मोफत धान्य किंवा सवलतीचे रेशन मिळणं थांबू शकतं!

ई-केवायसी कशासाठी गरजेचं आहे?
सरकारच्या म्हणण्यानुसार, फसवणूक, अपात्र लाभार्थी आणि बनावट कार्डधारकांना टाळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. यामार्फत प्रत्येक लाभार्थ्याची ओळख आधार कार्डशी लिंक करून पडताळणी केली जाते. त्यामुळे फक्त खऱ्या आणि पात्र कुटुंबांनाच रेशन योजनेचा लाभ मिळणार आहे. ही प्रक्रिया शासनाच्या खर्चावर नियंत्रण आणि लाभाचा योग्य वाटप करण्यासाठी महत्त्वाची आहे.
अंतिम मुदत वाढवली, पण वेळ हातातून जाऊ देऊ नका!
पूर्वी ई-केवायसीसाठी ३१ मार्च २०२५ ही अंतिम तारीख ठरवण्यात आली होती. मात्र अनेक नागरिकांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे, ही अंतिम मुदत वाढवून ३० जून २०२५ करण्यात आली आहे. म्हणजेच तुमच्याकडे आता थोडाच वेळ शिल्लक आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमचं राशन कार्ड सुरक्षित ठेवा.
ई-केवायसी करण्यासाठी दोन सोप्प्या पद्धती!
ई-केवायसी करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत –
ऑनलाइन पद्धत:
▪️ राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या वेबसाइटवर लॉगिन करा
▪️ आधार क्रमांक टाका आणि मोबाईलवर आलेला OTP वापरून पडताळणी करा
ऑफलाइन पद्धत:
▪️ जवळच्या रेशन दुकानात जा किंवा सरकारी सेवा केंद्रावर भेट द्या
▪️ आधार कार्ड, मोबाईल नंबर घेऊन बायोमेट्रिक पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण करा
ई-केवायसी न केल्यास काय होईल?
जर तुम्ही ई-केवायसी वेळेत केली नाही, तर तुमचं नाव राशन कार्ड योजनेतून वगळलं जाईल. त्यामुळे तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि इतर मोफत धान्य योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया अजिबात दुर्लक्षित करू नका.
नाव लिस्टमधून वगळलं गेलं तर काय करायचं?
काही वेळा ई-केवायसी करूनही नाव यादीतून वगळलं गेलं असेल, तर घाबरू नका. अशा परिस्थितीत लगेच स्थानिक अन्न व नागरी पुरवठा कार्यालयात संपर्क करा किंवा जवळच्या रेशन दुकानात भेट द्या. सोबत आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व इतर कागदपत्रं घेऊन जा आणि नवीन अर्ज दाखल करा.
कोणत्या योजनांवर परिणाम होणार?
ई-केवायसी न झाल्यास खालील योजनांचा लाभ बंद होईल –
▪️ मोफत गहू, तांदूळ, डाळी
▪️ सवलतीच्या दरात धान्य
▪️ अन्न सुरक्षा योजना
▪️ राज्य शासनाच्या विशेष अन्न योजनेचा लाभ
यामुळे हे काम फारच महत्वाचं आहे.
एक अंतिम आवाहन – तुमच्या परिवाराच्या हक्कासाठी आजच कृती करा!
शेकडो गरिब कुटुंबांना सरकारकडून मोफत धान्य दिलं जातं, पण याचा लाभ घेण्यासाठी तुमचं राशन कार्ड अद्ययावत असणं अत्यंत गरजेचं आहे. ३० जून ही अंतिम तारीख आहे – एकही दिवस न गमावता, तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमचं राशन, अधिकार आणि भविष्यातील सुरक्षा अबाधित ठेवा!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















