राज्यात १२०० अंगणवाड्यांमध्ये ९१ पदे रिक्त, नवीन पदभरती त्वरित करण्याची मागणी! | DWCD Goa Anganwadi Bharti
Goa Anganwadi Bharti
DWCD Goa Bharti & Goa Anganwadi Bhartiराज्यातील सुमारे १२०० अंगणवाड्यांपैकी ९१ पदे सध्या रिक्त असून, एक अंगणवाडी बंद आहे. रिक्त पदांमध्ये ३७ अंगणवाडी कर्मचारी आणि ५४ अंगणवाडी सेविकांच्या जागांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत अंगणवाडीतील बालकांच्या पोषणासाठी केंद्र सरकारकडून राज्याला ७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिली आहे. सध्या गोआ राज्यातील अंगणवाड्यांमध्ये अणे पदे रिक्त आहे. या टिकर पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी असा सर्व स्तरातून आग्रह होत आहे.
अंगणवाड्यांना केंद्र सरकारची मदत
देशभरातील अंगणवाड्यांच्या सुविधांबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी राज्यसभेत माहिती दिली. गोव्यात मंत्रालयाने १,२६२ अंगणवाड्यांना मान्यता दिली असून, त्यापैकी १,२६१ अंगणवाड्या कार्यरत आहेत. केंद्राच्या “मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०” योजनेअंतर्गत राज्याला ७५.९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील ६४.२३ कोटी रुपये आधीच वापरण्यात आले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अंगणवाड्यांच्या सुधारण्यासाठी विशेष निधी
पुढील पाच वर्षांत ५०,००० अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाची योजना आखण्यात आली आहे. दरवर्षी १०,००० अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी प्रति अंगणवाडी १२ लाख रुपयांचा निधी मिळतो. यामध्ये मनरेगाचे ८ लाख रुपये, १५व्या वित्त आयोगाचे २ लाख रुपये आणि महिला व बालविकास मंत्रालयाचे २ लाख रुपये अशा स्वरूपात निधी देण्यात येतो.
सक्षम अंगणवाडी – एक आधुनिक सुविधा केंद्र
सामान्य अंगणवाड्यांच्या तुलनेत सक्षम अंगणवाड्यांमध्ये अधिक चांगल्या सुविधा असणार आहेत. त्यामध्ये एलईडी स्क्रीन, पाण्याचा फिल्टर, पोषण वाटीका, ग्रंथालय आणि चांगल्या दर्जाची खेळणी यांचा समावेश आहे. तसेच, भाड्याच्या जागेत चालणाऱ्या अंगणवाड्यांना जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
अंगणवाड्यांचे बळकटीकरण हे सरकारचे प्राधान्य
बालकांचे पोषण, शिक्षण आणि आरोग्य सुधारण्यासाठी अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरून अंगणवाड्यांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. राज्य सरकार या दिशेने पावले उचलत असून, लवकरच रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.