Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ITI इन्स्ट्रक्टर आणि रेल्वे भरती परीक्षा एकाच दिवशी !

DVET ITI Exam Date Rail Exam Same Date – 2022 राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयटीआय इन्स्ट्रक्टरची (ITI Instructor 2022) परीक्षा 28 आणि 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. 1 हजार 457 पदांसाठी परीक्षा होणार असून मोठ्या संख्येने उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. आता त्याच दरम्यान रेल्वे भरती गट ड (Railway Recruitment Exam Group D 2022) परीक्षा नियोजित असल्याने दोन्ही परीक्षांचे अर्ज भरलेले उमेदवार अडचणीत आले आहेत. त्यामुळे आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा 8 ऑक्टोबरनंतर घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

 

आयटीआय इन्स्ट्रक्टर परीक्षा 8 ऑक्टोबरनंतर घेण्याची मागणी

रेल्वे भरती गट ड परीक्षा 2019 ही (Railway Recruitment Exam Group D 2019) आधीच नियोजित केली होती, त्यानुसार राज्यात 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा घेतली जात आहे. तर 8 ऑक्टोबरला एमपीएससी संयुक्त गट ब (MPSC Exam 2022) परीक्षा आहे. त्यामुळे आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा पुढे ढकलल्यास उमेदवारांना इतर परीक्षा देता येतील असे उमेदवारांचे म्हणणे आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळावी यासाठी या परीक्षा पुढे ढकलव्यात अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने सुद्धा राज्य सरकारकडे केली आहे.

महत्त्वाच्या तारखा :

  • आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा 2022 तारीख : 28 आणि 29 सप्टेंबर 2022
  • रेल्वे भरती गट ड परीक्षा 2019 तारीख : 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022

उमेदवारांची न्यायालयात जाण्याची तयारी

त्या संदर्भात काही उमेदवारांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुद्धा दर्शविली आहे आणि जर विद्यार्थी न्यायालयात गेले तर पुन्हा एकदा परीक्षा लांबणीवर पडू शकते आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे परीक्षा 08 ऑक्टोबरनंतर घेण्यात यावी, असं उमेदवारांचं त्यासोबतच विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड