अकरावी प्रवेशासाठी तयार व्हा, पॉलिटेक्निक आणि ITI प्रवेश कधीपासून सुरू होणार पूर्ण माहिती! – DVET ITI प्रवेश प्रक्रिया २०२५

DVET ITI Admission 2025

आता दहावीचा निकाल लागला  आणि ११  विच्या प्रवेश प्रक्रियेचे वार सुरु झालं. आता पालक आणि विद्यार्थाना कुठे आणि कधी प्रवेश घ्यायचं याची चिंता लागली. याबाबदलच पूर्ण माहिती आम्ही येथे देत आहोत. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाद्वारे (DVET) ‘ITI’ प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होईल. राज्यात ‘ITI’ साठी दीड लाख जागा उपलब्ध आहेत. अकरावी आणि पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियाही सुरू होतील. येत्या आठवड्यात नोंदणी सुरू होणार आहे. कागदपत्रे तयार ठेवावी. ज्युनिअर कॉलेजमध्ये १९ मे पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. पॉलिटेक्निक प्रवेशांनाही लवकरच सुरुवात होईल. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून (DVET) ‘आयटीआय’ प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. सध्या राज्यात ‘आयटीआय’ प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध असून, सहा नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. विद्यार्थी आणि पालकांनी ‘डीव्हीईटी’च्या वेबसाइटवर भेट देण्याचे आवाहन ‘डीव्हीईटी’कडून करण्यात आले आहे. आता बघूया अन्य प्रवेश प्रक्रिया बद्दल माहिती.

DVET ITI Admission 2020

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, अकरावी, डिप्लोमा आणि ‘आयटीआय’ प्रवेश प्रक्रिया वेग धरणार आहेत. येत्या आठवड्यात तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियामध्ये नोंदणी प्रकिया सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कागदपत्रे आणि दाखले काढून ठेवावे, अशी माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या निकालात १.७१ टक्क्यांची घट झाल्याने यंदा प्रवेशासाठी फारशी अडचण येणार नाही. मात्र, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर येथील नामांकित संस्थेत प्रवेशासाठी चुरस राहणार आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अकरावीसाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू,विद्यार्थी नोंदणी १९ मेपासून…- FYJC Admission 2025

राज्यातील यंदा सर्व ज्युनिअर कॉलेजांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना येत्या १९ मेपासून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. सध्या कॉलेजांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in ही स्वतंत्र वेबसाइट कार्यन्वित केली आहे. राज्यातील जवळपास ११ हजार ७०० ज्युनिअर कॉलेजांमधील अकरावीच्या सुमारे १६ लाख ७६ हजार जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे ऑनलाइन नोंदणीद्वारे ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना एका अर्जातच विविध भागांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यांच्या देखरेखीखाली संबंधित जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. याशिवाय विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड