DPharm झालेल्या विद्यार्थ्यांना द्यावे लागेल ‘DPEE’ परीक्षा; नंतरच मिळणार फार्मासिस्ट म्हणून मान्यता…!
DPharm Deep Exam
प्राप्त माहिती नुसार DPharm म्हणजेच Diploma in Pharmacy उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन (DPEE) ही परीक्षा लागू केल्याने लाखो विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. भारत सरकारने याबाबत राजपत्र काढून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागेल असा फतवा काढलेला आहे. या राजपत्राच्या आधारे राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, न्यू दिल्ली (आयुर्विज्ञान) या संस्थेने अधिसूचना काढून विद्यार्थ्यांना दि. 13 सप्टेंबर पर्यंत परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्यास कळविले आहे. परंतु या DPEE परीक्षेची परीक्षा फी ही भरमसाठ (5900/- रु.) असल्याने लाखो विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे त्यामुळे विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
देशात कोणत्याही डिप्लोमा कोर्सेससाठी अशी एक्झिट एक्झाम घेतली जात नाही, परंतु डी फार्म या डिप्लोमा कोर्ससाठी फक्त शासनाने ही परीक्षा का आणली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात ही विद्यार्थी परीक्षा द्यायला तयार आहेत पण ही भरमसाठ परीक्षा फी पाहून गरीब विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत. एकीकडे राज्य शासन लाडकी बहिण योजना राबवून बहिणींना 1500 रु. महिन्याला देत आहे तर दुसरीकडे केंद्र/राज्य शासन लाडक्या बहिणींच्या मुलांकडून 5900 रु. परीक्षा फी वसूल करत आहे. ही विसंगती दूर करण्यात यावी अन्यथा राज्यभर विद्यार्थी आंदोलन करणार अशी भूमिका 2024 ला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. वेळ पडल्यास हे विद्यार्थी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही सांगितले जाते आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.