BMC Executive Assistant Bharti Result 2026
BMC bharti Result 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘ कार्यकारी सहायक’ संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत सरळसेवा भरती प्रक्रीया राबविण्याकरिता जाहिरात क्र. एमपीआर/7814 दि. 14.08.2024 व सुधारीत जाहिरात क्र. एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने दि. 02.12.2024 ते दि. 06.12.2024 दि. 11.12.2024 आणि दि. 12.12.2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष तयार केलेली तात्पुरती निवड यादी क्र. 4 सूचनापत्र क्र. एमपीआर/9543 दि. 08.06.2026 अन्वये प्रसारीत करण्यात आलेली आहे. तसेच सदर यादीमधुन विविध कारणास्तव उमेदवारांची नावे सूचनापत्र क्र. एमपीआर/921 दि.07.09.2026 अन्वये कमी करण्यात आली आहेत. क्र. अति.आ./शहर/सीओएन/178 दि. 21.09.2026 अन्वये प्राप्त मान्यतेनुषंगाने शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष गुणवत्तेनुसार व निवडीचे निकषानुसार पुढील उमेदवारांचा समावेश करुन अद्ययावत तात्पुरती निवड यादी क्र. 5 पुढील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई कार्यकारी सहाय्यक MPR/7814 भरती निवड यादी PDF डाउनलोड लिंक
BMC bharti Result 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या सामान्य प्रशासन विभागामार्फत, ‘कार्यकारी सहायक’ (Executive Assistant) या पदासाठीच्या ‘थेट भरती प्रक्रिया २०२४’ (Direct Recruitment 2024) संदर्भात ७ सप्टेंबर २०२६ रोजी दोन महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सूचना क्रमांक MPR/921 मध्ये कागदपत्र पडताळणीनंतर यापूर्वीच्या तात्पुरत्या निवड यादीतून (Provisional Selection List No. 4) वगळण्यात आलेल्या उमेदवारांची यादी दिली आहे; तर सूचना क्रमांक MPR/964 मध्ये उमेदवारांची प्रवर्गनिहाय तात्पुरती स्थिती (उदा. पात्र, अंशतः पात्र, प्रलंबित, अपात्र किंवा अनुपस्थित) दर्शवण्यात आली आहे. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी आपला रोल नंबर किंवा अर्ज अनुक्रमांक (application sequence number) वापरून या सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात आणि BMC द्वारे देण्यात आलेल्या पुढील सूचनांचे पालन करावे.
बृहन्मुंबई कार्यकारी सहाय्यक MPR/921 भरती निवड यादी PDF डाउनलोड लिंक
बृहन्मुंबई कार्यकारी सहाय्यक MPR/964 भरती निवड यादी PDF डाउनलोड लिंक
BMC Bharti Result 2026
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘करनिर्धारण व संकलन’ खात्याच्या आस्थापनेवरील ‘निरीक्षक’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी क्र. कवसं/१९१७/एमसी/२०२४-२५ दि. १६.०९.२०२४ रोजी जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने दि. १०.१२.२०२४ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर दि. १०.०३.२०२५ रोजी गुणवत्ता यादी तसेच दि. १६.०४.२०२५ रोजी प्रथम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, प्रथम निवड यादीतील काही उमेदवारांची पदे त्यांच्या समोर नमूद केलेल्या कारणांमुळे रिक्त राहिल्याने, त्यानुसार दि. १७.१०.२०२५ रोजी द्वितीय निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Inspector Recruitment 2024 – 1st Ineligibility List of Candidates
BMC Bharti Result 2026
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानपालिका आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीतील मानव संसाधन विभाग यांच्या मार्फत मानव संसाधन रामन्वयक (कनिष्ठ) या संवर्गातील एकूण ३८ रिक्त पदांसाठी दि.२२.०२.२०२४ रोजी क्र. एमसीजीएम/एचआर/२२६८ दि.२०.०२.२०२४ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीची प्रकिया प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. या भरती प्रकियेत ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांनी कृपया याची नोंद घ्यावी.पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
💥BMC Bharti Cancel Notice
BMC Bharti Result 2025
जाहिरात क्र. एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि.06.12.2024, दि.11.12.2024 आणि दि.12.12.2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दि.25.02.2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामाईक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष उमेदवारांची तात्पुरती निवड यादी क्र.1 सूचना पत्र क्र. एमपीआर/903 दि.08.04.2025 अन्वये व सूचना पत्र क्र. एमपीआर/4461 दि. 14.10.2025 अन्वये तात्पुरती निवड यादी क्र. 2 प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुनुषखालील नमूद यादीमधील उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील प्रक्रीयेकरिता उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना देण्यात येत आहेत.
1) खालिल तक्त्यामध्ये नमूद दिनांकारोजी सकाळी 11.00 वाजता स्थळ- प्रशासकीय अधिकारी समिती सभागृह क्र.1, दुसरा मजला, जुनी इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – 400001 येथे उपस्थित रहावे.
2) सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, परिक्षेचे प्रवेश प्रत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक, समांतर आरक्षण विषयक व अन्य सर्व कागदपत्रे, नजीकच्या कालावधीतील तीन फोटो व जन्मतारखेच्या पुराव्यासह तसेच, दिव्यांग आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निर्णय दि. 14.09.2018 नुसार चे नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, शासन निर्णय दि.05.10.2021 सोबतचे Appendix-i, Appendix-ii,udid card, लेखनिकाचे शैक्षणिक कागदपत्रे आणि स्वयंघोषणापत्रसह नियोजित स्थळी, दिनांक व वेळेस उपस्थित राहावे.
3) सदर कार्यवाही दरम्यान उमेदवाराचा बायोमेट्रिक डाटा घेण्यात येणार असल्याने या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या:
(क) जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि उपस्थित राहाव्याच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.
(ख) जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Fingerprints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हाताची बोट सुकली आहेत याची खात्री करून घ्या. (ग) दोन्ही हातांची बोट सुकली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा.
4) तसेच, निवड प्रक्रीयेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवाराने चुकीची माहिती दिली किंवा भरतीप्रक्रियेचे उल्लघंन केल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याला/तिला निवड प्रक्रीयेदरम्यान अपात्र ठरविण्यात येईल. तसेच, सदर बाब भरती प्रक्रीयेनंतर निदर्शनास आल्यास पूर्वलक्षी प्रभावाने उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी भरती प्रक्रीयेअंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ तसेच इमेल उमेदवारांनी वेळोवेळी पहावे.
बृहन्मुंबई लिपिक भरती प्रतीक्षा यादी PDF डाउनलोड लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















