Download MSBSHSE App : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्वतःचे अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे केवळ दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रकच नव्हे तर परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व आनुषंगिक माहिती मिळवणे अधिक सोपे झाले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एसएससी बोर्डातर्फे फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या बारावी, दहावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रके राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर २१ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेत गणित व विज्ञानाच्या तीव्रतेच्या निकषात कोणताही बदल नाही. बोर्डाकडून विद्यार्थी, पालक, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या सोयीसाठी MSBSHSC हे अॅप विकसित करण्यात आले आहे. यामध्ये दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक, मार्च २०२४ परीक्षेच्या ठरावीक विषयांच्या प्रश्नपत्रिका, तसेच विविध परिपत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासह राज्यातील नऊ विभागीय मंडळांची माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
About this app

विशेष म्हणजे हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. या अॅपमुळे विद्यार्थी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना एका क्लिकवर सर्व माहिती मिळणार आहे.
शाळा, महाविद्यालयांसाठी सोय
या अॅपवर विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासह नमुना प्रश्नपत्रिका वेळापत्रक निकालासह आनुषंगिक बाबी देखील विद्यार्थ्यांसाठी येथे आहेत. शुल्क परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण यासह आनुषंगिक सुविधा शाळांसाठी आहेत. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या काळात लागणारे प्रमाणपत्र तसेच अन्य माहिती देखील या अॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Click Here To Download MSBSHSE App
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















