डोळे येणे ला ‘हे’ आहे इंग्रजी नाव; ‘या’ घरगुती उपचारांनी मिळेल लगेच आराम

डोळे येण्याचा मूळ त्रास होतो तो वेगळाच पण आपला त्रास लोकांना सांगायचा कसा हाच मुख्य प्रश्न अनेकांना पडतो. ऑफिसमध्ये कॉल करून बॉसला डोळे आलेत असं सांगितलं तर कदाचित कळणार नाही पण मग या आजाराला नाव तरी काय? अनेकजण My eyes have come, My Eyes are Here अशा भन्नाट शब्दात स्पष्टीकरण द्यायला जातात पण मित्रांनो थांबा.. फजिती करून घेऊ नका आपण आज या आजारा विषयी सविस्तर जाणून घेऊयात..

डोळे येण्याला काय म्हणतात? What is “dole yene” called in English?

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा डोळे येणे याला इंग्रजीत काय म्हणावे. डोळे येण्याला शास्त्रीय नाव हे किरॅटो कंजायटिव्हिटिस असे आहे पण त्याचा अपभ्रंश होऊन आपण कंजेक्टीव्हायटीस असे म्हणू शकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही बॉसला किंवा डॉक्टरांना याविषयी सांगाल तेव्हा मला डोळे आलेत यापेक्षा कंजेक्टीव्हायटीस झाला आहे असेही म्हणून बघा.

Conjunctivitis, also known as pink eye, is inflammation of the outermost layer of the white part of the eye and the inner surface of the eyelid. Itching of the eye is more common in cases due to allergies. Conjunctivitis can affect one or both eyes. The most common infectious causes are viral followed by bacterial.

 

डोळे येण्याचा त्रास शक्यतो संसर्गामुळेच होत असतो म्हणजेच जर कोणाला अगोदरच डोळे आले असतील आणि आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला डोळे येण्याची शक्यता असते. तर काही वेळा सर्दीमुळे किंवा प्रवासात डोळ्यामध्ये काहीतरी कसूभर गेल्यामुळे डोळे चुरचुरतात व अशावेळी डोळे खूप चोळल्यास डोळे येण्याचा त्रास होऊ शकतो.

डोळे येण्याची लक्षणे

डोळ्यांमध्ये काही तरी गेल्यासारखे खुपते.
एक-दोन दिवसांत डोळा लाल दिसू लागतो.
डोळ्यांतून सुरुवातीला पाणी, नंतर चिकट घाण येऊ लागते.
सकाळी उठल्यावर पुवाने दोन्ही पापण्या चिकटल्या जातात.
डोळ्यांतून सतत पाणी येणे, जळजळ होणे व प्रकाश सहन न होणे.
डोळे येणे या आजारामागे एक ठोस कुठलेही कारण नाही त्यामुळे अमुकच एक उपाय करून त्यावर उपचार होईल असे सांगता येत नाही. पण पूर्वापार चालत आलेल्या काही सोप्या घरगुती उपायांनी आपण यावर आराम मिळू शकतो. चला तर असे उपाय जाणून घेऊयात..

१) डोळे आल्यावर आपण कापूर जाळून धूरी घ्यावी. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.
२) एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील पु बाहेर पडण्यास मदत होते.
३) चांदीच्या स्वच्छ दागिन्यांना काहीवेळ पाण्यात ठेवावे व मग ते पाणी डोळ्यात थेंबभर टाकल्याने आराम मिळतो.
४) डॉक्टरांकडून डोळे स्वच्छ होण्यासाठी ड्रॉप्स दिले जातात त्यांचा नीट व न चुकता वापर करावा.
५) ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवून नंतर त्या डोळ्यावर ठेवल्याने थंडावा मिळतो.
६) डोळे आल्यावर सूर्यप्रकाशच नव्हे तर घरातील ट्यूबलाईटचा प्रकाशही सहन होत नाही त्यामुळे स्वच्छ गॉगल घालावा.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड