नवीन जाहिरात !! महापालिकेच्या रुग्णालयात ७००+ डॉक्टरांची भरती सुरु ! | Mega Doctor Recruitment!

Mega Doctor Recruitment!

मुंबईतील केईएम, सायन, नायर आणि कूपर ही महत्त्वाची महापालिकेच्या अधिपत्याखालील रुग्णालयं व वैद्यकीय महाविद्यालयं आहेत. सध्या या ठिकाणी डॉक्टरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. ही टंचाई दूर करण्यासाठी आता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतलाय.

Mega Doctor Recruitment!

७००हून अधिक डॉक्टरांची भरती होणार!
महापालिका प्रशासनाने माहिती दिली आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या माध्यमातून ७०० पेक्षा अधिक डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती मुख्यतः प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि इतर वैद्यकीय शिक्षक पदांसाठी असणार आहे. सर्व पदे पूर्णवेळ स्वरूपातील असणार असून, त्यासाठी स्वतंत्र जाहिरात लवकरच अपेक्षित आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा भार वाढतोय…
सध्या महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ८९१ सहाय्यक प्राध्यापक पदं मंजूर आहेत. मात्र त्यापैकी तब्बल ४३९ पदं रिक्त आहेत. ही स्थिती गंभीर आहे. यामुळे सध्या अनेक कंत्राटी प्राध्यापकांना सात-आठ वर्षांपासून कामावर ठेवण्यात आलेलं आहे. मात्र त्यावर कोणताही स्थायिक समाधान मिळालेला नाही.

विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि रुग्णसेवेलाही फटका
या रिक्त पदांमुळे केवळ डॉक्टरांवरचा कामाचा ताण वाढलेला नाही, तर वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि रुग्णसेवेची गुणवत्ता दोन्हीही धोक्यात आली आहे. प्राध्यापक वर्ग कमी असल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि रुग्णांवर वेळ देण्यात अडचणी निर्माण होतात. प्रशासकीय कामही प्रचंड वाढले आहे.

आरक्षणातील अडथळ्यामुळे रखडली भरती
ही भरती प्रक्रिया अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या तांत्रिक मुद्यांमुळे थांबवण्यात आली होती. मात्र आता महापालिका आयुक्तांकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सर्व फायली नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता अंतिम परवानगी मिळण्याची वाटच आहे.

भरतीमुळे वैद्यकीय शिक्षणात नवसंजीवनी
महापालिकेच्या या नव्या भरतीमुळे केवळ रिक्त पदं भरली जाणार नाहीत, तर वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा या दोन्ही विभागांना नवसंजीवनी मिळणार आहे. अधिक प्रशिक्षित, कायमस्वरूपी स्टाफ उपलब्ध झाल्यामुळे मुंबईतील रुग्णांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.

संचालकांचं स्पष्ट मत – गुणवत्ता सुधारेल!
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या संचालिका डॉ. नीलम आंद्राडे यांनी सांगितलं की, “या भरतीमुळे वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा यामध्ये निश्चितच गुणात्मक सुधारणा होणार आहे.” या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांची गुणवत्ता वाढेल आणि डॉक्टरांची उपलब्धता सहज होईल.

भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार!
सध्या सगळ्या फायली अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर असून, एकदा नगरविकास विभागाची मंजुरी मिळाली की लवकरच भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते रुग्णांपर्यंत सर्वांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड