Divyang School Bharti – महाराष्ट्रातील दिव्यांग विभागात अनेक पदे रिक्त आहे. या मुळे अनेक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. जर हि रिक्त पदे भरली तर नवीन उमेदवारांना नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील. दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तीच्या कल्याणासह त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधीनस्थ राज्यभरात १६ निवासी व कर्मशाळा चालवण्यात येतात. परंतु, या शाळांत १६ वर्षांपासून भरती प्रक्रिया राबवण्यात न आल्याने व्यवस्थापन कोलमडले आहे. मंजूर पदे २९१ असताना त्यांतील १९८ पदे रिक्त असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. सर्वाधिक रिक्त पदे काळजीवाहक आणि स्वयंपाकी पदांचे आहेत. त्यानंतर अधीक्षक पदाचा क्रमांक लागतो. बहुतांश ठिकाणी या पदाचा वरिष्ठ लिपिकांकडे प्रभार सोपविला आहे.

काळजीवाहकांअभावी दिव्यांग विद्यार्थ्यांची सुरक्षा व काळजी कुणी घ्यावी, असा प्रश्न व्यवस्थापनासमोर आहे. मंजूर पदांपैकी ८९ पदे भरली होती, तीसुद्धा २०१० पूर्वी. त्यानंतर जिल्हा दिव्यांग कल्याण विभागाकडून केवळ रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परंतु कुठलीही हालचाल आयुक्तालय व मंत्रालयीन स्तरावरून होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. रिक्त पदांमध्ये अधीक्षक, लिपिक, वरिष्ठ लिपिक, काळजीवाहक, स्वयंपाकी व इतर पदांचा समावेश आहे.
अशी आहेत रिक्त पदे – येरवडा ९, अंबाजोगाई १५, जळगाव २२, वर्धा १७, अकोला १२, मिरज ८, भंडारा १४, विरार १२, रायगड ६, वर्धा (आयटीआय) ७, वाशीम १७, सांगली १६, लातूर ४, नागपूर (दिव्यांग केंद्र) १५, नागपूर (कर्मशाळा) १०, नागपूर (बालविकासगृह) १४.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















