राज्यात होणार ३५९ दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी!
Divyang certificate Verification
कथित आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रामधील बोगसगिरी उजेडात आल्यानंतर महाराष्ट्रभरात चौकशी सत्र सुरू झाले आहे. दिव्यांगांसाठीच्या राखीव जागेवर नोकरी मिळवलेल्या ३५९ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. अहिल्यानगर व बुलढाणा या जिल्ह्यात बोगस अपंग प्रमाणपत्राचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती.
राज्यभरातील कथित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी त्यांनी शासनाला दिली असून त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. बोगस उमेदवारांमुळे दिव्यांगांवर अन्याय होत असून ते नोकरीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मागणी आ. कडू यांनी केली आहे. आ. बच्चू कडू यांनी १९ जुलै २०२४ ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबवले होते. त्यातून शासकीय व निमशासकीय विभागांत ३५९ बोगस उमेदवार आढळले आहेत. याबाबतची यादी त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे दिली. त्यानुसार आयुक्तांनी यादीतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. बोगस प्रमाणपत्रामुळे आ. बच्चू कडू हे आक्रमक झाले असून या सर्वांना घरी घालवण्याची त्यांनी मागणी केली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्हानिहाय अशी आढळली बोगस प्रमाणपत्र सातारा १२ • कोल्हापूर ११ पुणे २३ सिंधुदुर्ग ७ मुंबई६ सांगली १२ रत्नागिरी ४ रायगड १० अहिल्यानगर ३० • छत्रपती संभाजीनगर ९ नाशिक ११ बीड ९ • बुलढाणा ३० धुळे ८ नागपूर६ वाशिम १९ अकोला १९ लातूर ५ चंद्रपूर ६ हिंगोली ५ यवतमाळ ७ गडचिरोली १५ नांदेड १० जळगाव ५ सोलापूर २० ठाणे ९ भंडारा ९ पालघर ६ नंदुरबार ८ अमरावती १४ धाराशिव • परभणी ४ • जालना ३ वर्धा ३.
Comments are closed.