जिल्हा रुग्णालय, भंडारा अंतर्गत गट ड उमेदवारांची प्रतिक्षा यादी जाहीर; समुपदेशन २७ जानेवारी रोजी | District Hospital Bhandara Bharti Result

District Hospital Bhandara Bharti Result

District Hospital Bhandara Bharti Result: सामान्य रुग्णालय, भंडारा अंतर्गत दिनांक ३०/११/२०२३, दिनांक ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ रोजी घेण्यात आलेल्या गट-ड संवर्गातील पदभरती परीक्षा टि.सी.एस. कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती.  निवड पात्र उमेदवार यांनी रुजू होवुन राजीनामा दिल्यामूळे प्राप्त प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशनाकरीता उपस्थित राहण्याकरीता अंतीम संधी देण्यात येत आहे. उमेदवारांनी  दिनांक २७/०१/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, भंडारा संत कबीर वार्ड, भंडारा जि. भंडारा येथे न चुकता प्रमाणपत्रासह न चुकता हजर रहावे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जिल्हा रुग्णालय भंडारा येथील गट ड उमेदवारांची प्रतिक्षा यादी


 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

District Hospital Bhandara Bharti Result

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा (मुंबई) अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय भंडारा येथे रक्तपेढी-समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एआरटी केंद्रातील स्टाफ नर्स अशी एकूण तीन कंत्राटी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेनुसार ८ डिसेंबर २०२५ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली, तर ३० डिसेंबर २०२५ रोजी नियुक्त समितीद्वारे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. लेखी परीक्षा व मुलाखतीतील गुणांची एकत्रित बेरिज करून अंतिम गुणवत्ता व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली असून, गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत. तसेच अंतिम निकालाच्या दिनांकापासून एक वर्ष कालावधीसाठी प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली असून, सदर गुणवत्ता व प्रतीक्षा यादी www.bhandara.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Candidate Final Selection List

 


 

District Hospital Bhandara Bharti Result

भंडारा जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रातील रिक्त स्टाफ नर्स (१ पद) भरतीसाठी ११ सप्टेंबर २०२५ रोजी जाहिरात जाहीर करण्यात आली होती. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी १७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध करण्यात आली.सदर पदभरती मार्गदर्शक सूचनेनुसार प्राप्त आक्षेपाचा विचार पडताळणी समिती (Scrutiny Committee) यांचेकडून करून लेखी परिक्षेस अंतिम पात्र (Elegible) उमेदवारांची यादी www.bhandara.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर पदभरतीच्या अनुषंगाने आवश्यक www.bhandara.gov.in या संकेतस्थळावर भेट घ्यावी. माहितीकरिता वेळोवेळी उमेदवारांनी www.bhandara.gov.in या संकेतस्थळावर भेट घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

स्टाफ नर्स (कंत्राटी) पदासाठी अंतिम पात्रता यादी


 

District Hospital Bhandara Bharti Result

महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या अंतर्गत जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे ए.आर.टी. केंद्रातील स्टाफ नर्स (एक पद) या रिक्त कंत्राटी पदाची भरती जिल्हास्तरावर अटी व सूचनांनुसार करण्यासाठी ११/०९/२०२५ रोजी दैनिक भंडारा पत्रिका या वृत्तपत्रामध्ये तसेच www.bhandara.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांकडून २६/०९/२०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार पडताळणी समितीने पात्र आणि अपात्र (Eligible/Not Eligible) उमेदवारांची यादी १७/१०/२०२५ रोजी प्रसिद्ध केली आहे.

उमेदवारांनी या यादीबाबत आक्षेप असल्यास ते प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत, म्हणजेच ३१/१०/२०२५ पर्यंत, सकाळी १०.०० ते सायं. ५.३० या वेळेत आवश्यक अर्ज आणि कागदपत्रांसह जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले आक्षेप नोंदवावेत. या कालावधीनंतर आलेले कोणतेही आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी अंतिम पात्र उमेदवारांची यादी www.bhandara.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांनी पदभरतीसंबंधी पुढील सर्व अद्यतने व माहितीकरिता नियमितपणे या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड