कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

Direct Second Year B.Sc Agri Admission

Direct Second Year B.Sc Agri Admission : Krishi Tantraniketan diploma holders are admitted directly in the second year of the degree course. The schedule for the admission process for the second year agriculture degree course has been announced. According to the schedule, students will have to complete online registration by November 2. Further details are as follows:-

Admission Started For Direct Second Year B.Sc Agri Course

कृषी तंत्रनिकेतन पदविकाधारकांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात येतो. थेट दुसऱ्या वर्ष कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

कृषी तंत्रनिकेतन पदविकाधारकांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात येतो. थेट दुसऱ्या वर्ष कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २०२१-२२ शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना https://maha.agriadmissions.in या वेबसाइटवर प्रवेशोत्सुक उमेदवारांनी नोंदणी करावी लागणार आहे.

नोंदणी करतेवेळी उमेदवाराने वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अधिभार, प्रवर्गविषयक माहिती भरावयाची असून त्याच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून वेबसाईटवर अपलोड करावयाची आहेत. एकापेक्षा जास्त प्रवेश अर्ज दाखल केल्यास शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल, असे परिषदेने म्हटले आहे. या प्रक्रियेत १६ नोव्हेंबर रोजी पहिली प्रवेश फेरी होणार आहे. दुसरी प्रवेश फेरी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. आणि केंद्रनिहाय ऑनलाइन प्रवेश फेरी १९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश माहिती पुस्तिका वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी विचारपूर्वक जास्तीत जास्त महाविद्यालयांचे विकल्प भरावेत, उमेदवाराची गुणवत्ता, प्रवर्ग आणि विद्यार्थ्याने दिलेल्या महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम या बाबी विचारात घेऊन प्रवेशाचे वाटप करण्याची पद्धती अवलंबली जाणार आहे, असे संचालक हरिहर कौसडीकर यांनी म्हटले आहे.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड