१ ली ते १० वी युट्यूब चॅनेल्सच्या थेट लिंकसाठी क्लिक करा…

Direct Links of YoutubeChennel By SCERT

करोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या नाहीत तरी शिक्षण सुरू व्हावे, या उद्देशाने ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. या शिक्षणाच्या कक्षा आता रुंदावत जात असून सरकारतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने ४ युट्यूब चॅनेल तयार करण्यात आले आहेत

पहिली ते दहावीच्या अभ्यासाकरिता SCERT चे चार युट्यूब चॅनेल

ऑनलाइन शिक्षणासाठी राज्य सरकारने दिक्षा अॅपपासून विविध पर्याय खुले करून दिले आहेत. याचबरोबर सह्याद्री वाहिनीवर ‘टिलीमिली’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू केले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेची मदत घेतली. ऑनलाइन शिक्षणात मुंबई महापालिका आघाडीवर असल्यामुळे परिषद आणि महापालिकेने विविध इयत्तांसाठी युट्यूब चॅनेल्स सुरू केले आहेत. या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी केले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वेळापत्रकही जाहीर

शालेय शिक्षण विभागाने नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ऑनलाइन वर्गाच्या वेळापत्रकामध्ये पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीही सोमवार ते शुक्रवार अर्ध्या तासाची प्रत्येकी दोन सत्रे ठेवण्यात आली आहेत. तर पूर्व प्राथमिकच्या म्हणजेच छोटा शिशू व मोठा शिशू तसेच नर्सरीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी अर्ध्या तासाचे सत्र ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऑनलाइन वर्गाच्या वेळापत्रकामध्ये पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार अर्ध्या तासाची प्रत्येकी दोन सत्रे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये १५ मिनिटे पालकांशी संवाद आणि १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण देण्यात यावे, असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचेही शिक्षकांना ऑनलाइन वर्ग घ्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्व प्राथमिकमधील विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज अर्धा तास ऑनलाइन वर्ग घेऊन पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करायचे आहे

युट्युब चॅनेल्स आणि त्यांच्या थेट लिंक्स पुढीलप्रमाणे –

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Anjali Salunke says

    Sir semi medum sathiche video pathva ki. 1st to 10th standard

  2. Anjali Salunke says

    Sir semi medum sathiche video pathva ki

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड