डिप्लोमा ऍडमिशन यावर्षी महत्वाचा बदल बघा

Diploma Admission 2020

Diploma Admission 2020 -2021 – दहावी आणि बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली असून दोनच नियमित फेऱ्या होणार आहेत. तर, केवळ महाराष्ट्रात इयत्ता १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन आदेश जाहीर केले आहेत.

दहावीनंतर पाॅलिटेक्नीकला प्रवेश घेता येतो, तर इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या शाखांच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठीही प्रवेश देण्यात येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आणि प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने अद्याप जाहीर केले नसले प्रवेशासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

या अभ्यासक्रमासाठी इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी हे शिक्षण महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेत होणे आवश्यक होते. पण आता बदललेल्या नियमानुसार ८वी, ९वी इतर राज्यात केले तरी १०वी महाराष्ट्रात झाली असेल, तर या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दरवर्षी या सर्व अभ्यासक्रमाच्या तीन फेऱ्या होतात, पण यंदा दोनच प्रवेश फेऱ्या घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तिसरी प्रवेश फेरी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेचा कालावधी कमी होणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांनाही दोन प्रवेश फेऱ्यांचा आदेश लागू होणार आहे.

जे विद्यार्थी अर्ज भरू न शकलेले, प्रवेश न मिळालेले, न घेतलेले अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. दोन प्रवेश फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येतील. त्यात राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास इतर राज्यातील विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील.

आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयानुसार यंदा या अभ्यासक्रमांसाठी मराठा प्रवर्गासाठी १६ ऐवजी १२ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. यंदा अभ्यासक्रम किंवा संस्था बंद करण्यासाठी अर्ज केलेल्या संस्थांना यंदा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

– नियमात बदल केल्याने प्रवेश वाढण्याची शक्यता
– डिफेन्सच्या कोट्यासाठी ५ जागांऐवजी ५ टक्के जागा आरक्षित
– कागदपत्र तपासणीसाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार
– महाराष्ट्रात ८वी, ९वी उत्तीर्ण न होता, थेट १०वीत प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Anurag PAWAR says

    बारावी नंतर चे admission कशे करतील??

  2. Abhijit says

    अनुकंपा भरती कधी होणार ??

  3. Komal khandare says

    Hello..!! Majhe nav Komal ani me jalna ya city madhun 12th pass keli tya nantar kahi adchani mule r majhi education thambla gela ani 2years waste gele so aata mala education karaycha kahi tri carrier banvaycha so tumhi kahi madat karu shkta ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड