धुळे शिक्षण विभागात २५५ पद रिक्त! – Dhule Shikshan Vibhag Bharti 2021

Dhule Shikshan Vibhag Bharti 2021

Dhule Shikshan Vibhag Bharti 2021 – Dhule Education Department Bharti 2021 Details are given here. The ZP Schools Recruitment 2021 under Dhule Zilla. जिल्हा परिषदेत असलेल्या विविध आस्थापनांपैकी शिक्षण विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ११०३ जिल्हा परिषदांच्या शाळा असून, गेल्या वर्षांपर्यंत त्यात विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे या सर्व शाळा डिजिटल आहेत.

शाळा, विद्यार्थी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना मात्र शिक्षकांसह विविध पदांची कमतरता दिसून येत आहे.

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची ७४, पदवीधर शिक्षकांची ३७,पदोन्नती मुख्याध्यापकांची ४७, केंद्र प्रमुखांची ३३, विस्तार अधिकाऱ्यांची ०७ अशी पदे रिक्त आहेत.

साक्री तालुक्यात रिक्तपदांची संख्या जास्त – 

जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये साक्री तालुक्यात रिक्तपदांची संख्या जास्त आहे. या तालुक्यात शिक्षण विभागातील ८४ पदे रिक्त आहेत. त्यात विषय शिक्षक १४, प्राथमिक शिक्षक ३९, पदवीधर शिक्षक ०९, पदोन्नती मुख्याध्यापक ०२, केंद्र प्रमुख १४, शिक्षण विस्तार अधिकारी ६ असे एकूण ८४ पदे रिक्त आहेत.

धुळे तालुक्यात ४३, शिरपूर तालुक्यात ६५ व शिंदखेडा तालुक्यात ६३ विविध पदे रिक्त आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्यांमध्ये कष्टकरी, गरीब, व शेतकऱ्यांच्या मुलांचा सर्वाधिक समावेश असतो. शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्यास त्याचा ताण इतर शिक्षकांवर पडत असतो. काहीवेळा दोन वर्गांमधील मुलांना एकाच वर्गात बसवावे लागते. सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र, ग्रामीण भागात ऑनलाऊन व ॲाफलाईन शिक्षण सुरू झालेले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचे व्हाॅटस् ॲप ग्रुप करून त्यांना शिकवितात आहेत. दिवाळीनंतर या शाळा सुरू होऊ शकतील, असा अंदाज आहे. तत्पूर्वीच शिक्षण विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी होऊ लागलेली आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड