धर्मादाय कार्यालयातील निम्मी पदे रिक्त – Dharmaday Ayuktalay Kolhapur Bharti

Dharmaday Ayuktalay Kolhapur Bharti 2024

सार्वजनिक न्यास नोंदणी तथा सहायक धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात मंजूर असलेल्या ३१ पैकी १५ पदे रिक्त असल्यामुळे कामकाजात सतत विस्कळीतपणा येत आहे. रिक्त पदांत दोनपैकी एक सहायक धर्मादाय आयुक्त या महत्त्वाच्या पदाचाही समावेश आहे. उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सामाजिक संस्था सुरु करायची असेल, तर त्यासाठी त्याची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात करावी लागते. मंदिर, मठ, सार्वजनिक गणेश, दुर्गादिवी मंडळ आदी संस्थांसाठी ट्रस्ट स्थापन करावा लागतो. त्यानंतर धर्मादाय कार्यालयात त्याची रीतसर नोंद करुन घ्यावी लागते. याशिवाय, संस्थांची नोंदणी, बदल अहवाल सादर करणे, संस्थेचे लेखापरीक्षण दाखल करणे, आदी सर्व कामे या कार्यालयामार्फत होतात.

 

या कार्यालयात नियमित संस्थांच्या विविध विषयांवरती न्यायिक कामही चालत असते. धर्मदायी संस्थांवरील विश्वस्त अथवा कार्यकारी मंडळांच्या निवडणुकीची प्रक्रिया ठराविक काळानंतर संस्थेला पार पाडावी लागते. निवडणुकीनंतर येणाऱ्या नव्या संचालकांच्या नावांची यादी संस्थेला धर्मादाय आयुक्तांच्या दफ्तरी नोंद करावी लागते. कार्यरत मंडळातील पदाधिकारी, सदस्याने जर राजीनामा दिला, मृत झाले तर त्यांच्या रिक्त जागी नव्याची झालेली निवड याची माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयाला कळवणे संबंधित संस्थेस बंधनकारक असते. या कार्यालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक सहायक धर्मादाय आयुक्त पद रिक्त असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. दोन अधिकाऱ्यांचा पदभार एका अधिकाऱ्यावर आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी पद रिक्त आहे. लघुलेखक कनिष्ठ श्रेणी दोन पैकी एक पद रिक्त आहे. निरीक्षक ८ पदे असताना ३ रिक्त, वरिष्ठ लिपिक ५ पदे ३ रिक्त, लिपिक ८ पदे ५ रिक्त तर आदेशिका वाहक २ पैकी १ पद रिक्त आहे. पदे रिक्त असल्याने त्यांच्या कामावर मर्यादा येत आहेत. कामांसाठी अनेक नागरिकांना जिल्हाभरातून वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ajita Sonawane says

    Graphic design post is it available?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड