सहायक धर्मादाय आयुक्तांची दोन पदे दोन वर्षांपासून रिक्त!

Dharmaday Ayuktalay Pune Bharti 2025

येथील धर्मादाय सह आयुक्त कार्यालयात सहायक धर्मादाय आयुक्तांची दोन पदे दोन वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अनेक नोंदणीकृत सार्वजनिक संस्थांची (ट्रस्ट) ‘चेंज रिपोर्ट’ (बदल अहवाल) मंजुरीविना प्रलंबित आहेत. त्याचा फटका या संस्थांना बसत आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या पुणे विभागाकडे ७५ हजारहून अधिक सार्वजनिक संस्था नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, रहिवासी संघटना, महिला मंडळे, सार्वजनिक ग्रंथालये, सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि भाडेकरू संघटना आदींचा समावेश आहे. (Dharmaday Ayuktalay Pune Bharti 2025) या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Dharmaday Ayuktalay Pune Bharti 2025

पुण्यासह सातारा, नगर आणि सोलापूर अशा चार जिल्ह्यात असलेल्या या संस्थांचे नियमन करण्याचे काम धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडून केले जाते. त्यासाठी दोन सह आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक उप आयुक्त व चार सहायक आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. परंतु, सध्या या कार्यालयात केवळ एक उप व दोन सहायक धर्मादाय आयुक्त कार्यरत असून, दोन सहायक धर्मादाय आयुक्तांची पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. सहायक धर्मादाय आयुक्तांकडे ट्रस्ट व संस्थांची नोंदणीची जबाबदारी असते. सार्वजनिक संस्थांना विश्वस्त मंडळ किंवा पदाधिकाऱ्यांमधील बदलांचा अहवाल (चेंज रिपोर्ट) सादर करावा लागतो. सहायक आयुक्तांना हे ‘चेंज रिपोर्ट’ पाहावे लागतात. वार्षिक अंदाजपत्रक-लेखापरीक्षण अहवाल तपासावे लागतात. संस्थांना निर्देश देणे, त्यांच्या नियमावलीत योग्य ते बदल करण्याचे अधिकार सहायक आयुक्तांकडे असतात.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१९७२ मध्ये पुणे विभाग स्वतंत्र झाल्यानंतर अधिकारी पदांची निर्मिती झाली, परंतु त्यासोबत आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला नाही. गेली दोन वर्ष सहायक आयुक्तांची दोन पदे रिक्त असून, स्टेनोग्राफर, लिपिक आदी कर्मचारीही कमी आहेत. अन्य सहायक आयुक्तांवर आधीच कामाचा ताण असताना, रिक्त पदांमुळे अतिरिक्त कामांचा भार वाढत आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड